मध्य रेल्वे DRUCC सदस्य- *सुभाष साळुंके* यांनी रेल्वे अधिकारी व अंबरनाथ न. पा. अधिकारी यांच्या समवेत अंबरनाथ *रेल्वे स्टेशन परिसर व बी कॅबिंन नाल्याची केली संयुक्त पाहणी*.......!— खासदार *डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार ,आमदार डॉ. बालाजी किणीकर* यांच्या सहकार्याने *अंबरनाथ स्टेशन परिसर,रेल्वे स्थानकात प्रवेश करताना होणारी अडचण, पादचारी पुलावरील लाद्यांची दुरूस्ती, बी कॅबींन नाला सफाई व बांधणी, संरक्षक भिंत, पाण्याचा निचरा होण्यासाठी चार जून्या अरुंद कल्व्हर्टची नवीन बांधणी तसेच मोरीवली ते निसर्ग ग्रीन चा प्रस्तावित ROB* इ. बाबत अंबरनाथ स्टेशन प्रबंधक श्री. जॉय इब्राहम यांच्या दालनात *बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर स्थानक परिसर व बी कॅबिन नाला परिसराची संयुक्त स्थळ पाहणी केली.*सकारात्मक चर्चा व निर्णय :*1. *रेल्वे स्थानकात सोयीस्कर व प्रशस्त प्रवेश करता यावा याकरिता रिक्षास्टँड कडील मार्ग मोठा करून जुने रॅलिंग हटविणे, त्यामुळे Entey & Exist प्रवाशांसाठी उपयुक्त होईल.*2. पादचारी पुलाची आठवडा भरात दुरूस्ती करणे.3.RPF व अन्प कर्मचारी यांनी फेरीवाला मुक्त स्टेशन परिसर करण्यासाठी संयुक्त कारवाई करणे.4. बी कॅबिन नाल्याची खोली वाढविणे, बांधकाम करणे याकरीता रेल्वेने NOC देणे तसेच डिटेल्स प्लॅन बनविणे. यामुळे पावसाळ्यात राहुलनगर, बी कॅबीन परीसरात पूरग्रस्त परिस्थिती टाळता येईल.5. मोरिवली पाडा, नवरेनगर, बी केबिन कडून येणारे सांडपाणी तसेच पावसाळी पाणी वाहून जाणारे 4 अरूंद, काही बंद झालेले कल्व्हर्ट रुंद करणे, जेणेकरून चोकअप न होता पाण्याचा निचरा सहज होऊन रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही. यावर त्वरीत कारवाई करण्यात आली.6. बी कॅबीन रस्ता- रेल्वे हद्द यामधील रुंदीचा प्रलंबित वाद मिटविणे, याकरीता दोन्ही बाजूचे वास्तुविशारदची जॉईंट मीटिंग करणे,असे ठरले,7.अपूर्ण रेटेनिंग वॉल चे बांधकाम पूर्ण करणे.यावेळी रेल्वे अधिकारी श्री. दिपक सिंग, ट्रॅक अभियंता श्री. यादव, स्टेशन प्रबंधक श्री.जॉय अब्राहम,RPF इन्चार्ज अरविंद कुमार, अंबरनाथ नगर परिषदेचे उपमुख्यधिकरी संदिप कांबळे, आरोग्य अधिकारी श्री. सुरेश पाटील, शाखा अभियंता श्री. राजेश तडवी, आरोग्य निरीक्षक श्री.विलास भोपी व नितीन सावंत तसेच गोपी नायर, बाळा राऊत, राजकुमार जमखंडिकर, गणेश गायकवाड, बळीराम पालांडे, दिपक विशे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार