*मा. शिवसेना.नगरसेवक : सुभाष साळुंके व संवाद फाऊंडेशन अध्यक्षा,सौ सुवर्णा साळुंके यांच्या वतीने......* *महिला पोलीसाना दिली दिवाळी भाऊबीज भेट वस्तू..!*कोणताही सण, संकट असो किंवा बंदोबस्त असो, पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असते.कोरोना संकट समयी ३६५ दिवस Covid योध्याप्रमाणे पोलीस रस्त्यावर On duty सेवा बजावत होते, यामध्ये महिला पोलिस मागे नव्हत्या.म्हणूनच *महिला पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी निमित्त भाऊबीज करून वस्तू रुपी भेट देण्याचा संकल्प केला, त्याप्रमाणे आज अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधील २२ महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देऊन प्रत्येकी "वस्तुरुपी भाऊबीज भेट" दिली.**असा आगळा वेगळा कार्यक्रम करून आम्हां महिला पोलीस कर्मचारी यांना दिवाळी भेट देऊन सन्मानित केले, त्याबद्दल महिला पोलीसानी श्री. सुभाष साळुंके व सौ. सुवर्णा साळुंके यांचे विशेष आभार व्यक्त केले.*यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर भोगे साहेब, महिला पोलीस अधिकारी, शिवसेना पदाधिकारी, Jogger's क्लब चे राजकुमार जमखंडिकर, नाना भिसे, मंगेश पाडगांवकर,ॲड. प्रकाश खाडे, सुनिल देशपांडे, रामदास नरे,चंद्रकांत फलके ,संवाद च्या नंदिनी शेलार, आशा शहा, आशाताई शेकोकरे, मनिषा मसने, कविता शेलार, रविना Parte, उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार