उल्हासनगर कचरामुक्त शहर करायच्या कामात सक्रिय महिला पर्यावरण प्रेमी...उल्हासनगर शहरातील एक कर्तव्यनिष्ठ समाजसेविका, पर्यावरण प्रेमी, उल्हासनगर महानगर पालिका तर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा अभियानात प्रथम महिला स्वच्छता निरीक्षक, स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये स्वतःच्या विकास टॉवर रहिवासित इमारतीला ज़ीरो गार्बेज सोसायटी करुन प्रथम पारितोषिक प्राप्त करणारी, आज स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानात शासन निर्णय नुसार प्लास्टिक बंदी अभियानात एकूण 300 बेरोजगार महिलांना कागदी व कापडी पिशव्या निर्मिति करुन रोजगार देणाऱ्या वृक्ष फाउंडेशन च्या श्रीमती ज्योती तायडे यानी आता उल्हासनगर व आसपास चा परिसर ज़ीरो गार्बेज करुन कचरामुक्त करण्याचा संकल्प केला आहे,त्याची सुरुवात म्हणुन त्यांनी उल्हासनगर कैम्प 1 शहाड स्टेशन समोर असलेले कोणार्क रेसीडेंसी ह्या निवासी संकुलामध्ये 10 महिलांना रोजगार उपलब्ध करवुन देत ओला कचरा, सूखा कचरा व मेडिकल वेस्ट वेगवेगळे करुन त्यापासुन खत निर्मिती करणे, झाड़े व गार्डन चा सूखा पाला, पत्ते जमा करुन त्या पासुन खत निर्मिती करणे, प्लास्टिक पिशवी, थर्माकोल, बाटली, पेपर वेगवेगळे करुन त्यांना रिसाइक्लिंग करणेअशी कामे गेल्या 6 महिन्यापासुन सोसायटी चे चेयरमैन डॉ नागपाल, पर्यावरण प्रेमी रेखा ठाकुर जी व उल्हासनगर महानगर पालिकेच्या सहकार्यने सुरु केलेली आहेत, त्या अनुषंगाने येणाऱ्या महिन्यात कोणार्क रेसीडेंसी ही उल्हासनगर ची पहिली सोसायटी जी कचरामुक्त ज़ीरो गार्बेज सोसायटी ठरेल ह्या सोसायटी च्या कचर्याची विल्हेवाट सोसायटी मध्येच लावली जाईल व उल्हासनगर मनपा च्या डंपिंग ग्राउंड वर कचरा जाणार नाही अशी खात्री ज्योती तायडे यानी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार