संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षासौ.सुवर्णा सुभाष साळुंके यांच्या वाढदिवसानिमित्त माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्षरोपण तसेच "नारी इन सुंदर सारी" या मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन , महिलांचा उत्स्फूर्त सहभाग......अंबरनाथ मधील नगरसेवक सुभाष नारायण साळुंके आणि संवाद फाउंडेशन अध्यक्षा सुवर्णा साळुंके गेले अनेक वर्ष महिलांच्या कला गुणांना वाव देण्याचे दृष्टीने विविध कार्यक्रम राबवित आहेत 'नारी इन सुंदर सारी' या स्पर्धेचे प्रथम विजेते कु. पौर्णिमा शिंदे, द्वितीय– सौ.श्रद्धा परर्देशी , तृतीय क्रमांक सौ.सुनिता अरगडे आणि सौ.मालती नाचरे यांना देण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित केले.यास्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. पद्मा देशपांडे, प्रा. यास्मिन शेख, प्रा. वृंदा पटवर्धन यांनी उत्कृष्टपणे कामगिरी बजावली.इ.१०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन 39 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ,कल्याण येथे नोंदणी करून घेतलेल्या 53 घरेलू महिलांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. संवाद आणि प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने *५४ घरेलू कामगार महिलांना पाच दिवस मोफत प्रशिक्षण दिल्याचे प्रमाणपत्र वाटप* करण्यात आले. १) *कु. नयना पाटणकर* (वडवली विभाग) अंध असूनही बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळविण्यासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल...२) *प्रा. वृंदा दत्तात्रेय पटवर्धन* (लघु उद्योजिका)यांनी अध्यापना चे काम करून नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने ची निर्मिती करणारा *स्वरा नॅचरल्यस* ब्रँड विकसित केल्याबद्दल..३) *सौ. कुंदा राजाराम साळुंके* (घरेलु कामगार) कमी वेळात अधिकची कामे तसेच बाल संगोपन करीत अधिक उत्पन्न घेत कुटुंबाचा डोलारा उभा केल्या बद्दल....इ. कर्तुत्वान महिलांना *संवादिका गौरव पत्राने* सन्मानित करण्यात आले.#ऑनलाइन पार पडलेल्या स्पर्धा....*केक मेकिंग,* *रांगोळी स्पर्धा,* *कापडी मास्क बनविणे स्पर्धा,**फुलांची सजावट*इ. स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.यावेळी शिवसेना महिला जिल्हा संपर्क प्रमुख सौ. मृणाल यदनेश्र्वर, जिल्हा प्रमुख सौ. विजया पोटे, उपजिल्हा संघटक सौ. अंजली राऊत, शहर संघटक सौ. मालती पवार, उपशहर संघटक सौ. नीता परदेशी, सौ. वासुदेवी शिरूर,सौ. रेखा जेठवा, मा. नगरसेविका सौ. सुप्रिया देसाई,सौ. रेश्मा गुडेकर,सौ. रेश्मा काळे,सौ. लतिका कोतेकर,सौ. शिल्पा नाचरे, प्रथम फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुनिता बनसोडे इ. मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संवाद फाऊंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी युवक, युवती, महिला व ज्येष्ठ नागरिक इ. साठी सातत्याने करत असलेल्या शिबिरे, कार्यक्रम व उपक्रमाची माहिती यावेळी दिली.सूत्रसंचालन सौ. स्मिता जाधव यांनी केले. यावेळी सौ. सुवर्णा साळुंके यांच्या जीवन वाटचालीचा आढावा घेणारा चल चित्र दाखविण्यात आला.शिवम नृत्य कला ग्रुप यांनी नवदुर्गा नृत्य तर पौर्णिमा शिंदे हिने मराठमोळी, ठसठशीत लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकेत पारटे,सुनिल देशपांडे, बळीराम पालांडे, दिपक विशे, चंद्रकांत फाळके, सौ. नंदा देशपांडे,सौ.सुनंदा मांढरे,सौ.नंदिनी शेलार, सौ.मनिषा मसने, श्रीमती आशा शेकोकरे, कविता शेलार,सौ. सुषमा आचरेकर,ॲड. मानसी गिरी,सौ. सुप्रिया दुधाणे, सौ. सुनिता रघुनाथन,सौ.काजल जव्हेरी, सौ. प्रतिभा पाटील,सौ. सुजाता राव , कु. सार्थक साळुंके व कु. सुमित बनसोडे यांनी परिश्रम घेतले.महिलांनी कार्यक्रमाचा उत्स्फूर्त आस्वाद घेऊन आनंद व्यक्त केला.. यावेळी उपस्थितांना मास्क, Sanitizer, चहापाणी व नाष्टा ची व्यवस्था करण्यात आली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार