राज्यात थंडीची लाट! शिर्डीमध्ये एका भिक्षेकऱ्यासह दोघांचा गारठून मृत्यूदोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि प्रचंड गारठ्यामुळे शिर्डीत दोघांचा मृत्यू झाला. त्यातील एक जण मुंबईहून उपचारासाठी शिर्डीत आल्याचे तर दुसरा भिक्षेकरी असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, पाऊस आणि गारठ्यामुळे दगावलेल्या शेळ्या-मेंढ्यांची संख्या दीड हजारांवर गेल्याचे सांगण्यात येते. सध्या पाऊस थांबला असला तरी हवामान ढगाळ आणि हवेत गारठा कायम आहे.बुधवारपासून जिल्ह्यातील हवामान बदलले आहे. त्याचा फटका रबी पिकांना आणि पशुधनालाही बसला. आता शिर्डीत दोघांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. शिर्डीत नगर-मनमाड रोडवर एक आणि कणकुरी रोडवर एक असे दोघांचे मृतदेह आढळून आले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतले. दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, एका मृतदेहाजवळ काही कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यावर एकनाथ हाटे (रा. कल्याण, मुंबई) असा उल्लेख आहे. कागदपत्रावरून ही व्यक्ती शिर्डीत उपचारासाठी आली असावी, असा अंदाज आहे. त्या आधारे पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून खात्रीशीर ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दुसऱ्या मृतदेहाजवळ मात्र काहीही आढळून आलेले नाही. तो भिक्षेकरी असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार