बदलापूर अंबरनाथ नंतरआता उल्हासनगर मध्येही बिबट्याची दहशत
उल्हासनगर मधील सुभाष टेकडी, *सोंग्याची वाडी* येथे काल मंगळवारी 11 जानेवारी 2022 रोजी भारत नगर येथील एका *आनंदी* *संजय गुंडे* नावाच्या 5 वी वर्गात शिकणाऱ्या 12 वर्षाच्या बालिकेस संध्याकाळी 4.30 ते 4.45 दरम्यान ती भारत नगर येथील बुद्ध विहाराजवळ आपल्या मैत्रिणींसोबत खेळत असता तिला सोंग्याच्या वाडीत मगरे ताई यांच्या घराच्या पाठीमागे *वाघ दिसला* .( *बिबट्या* *नाही* )
तिने रडत घाबरत घरी येऊन ही बातमी प्रथम आईला व नन्तर परिसरात कळवली.
त्यांनतर ही बातमी पुढील काही मिनिटात वाऱ्यासारखी संपुर्ण उल्हासनगर मध्ये पसरली.वनविभागाला तातडीने पाचारण करण्यात आले.त्यांनी आपल्या पथकासह सर्व वाडीत शोधमोहीम केली नंतर त्या भागात अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोटी सारखी आग लावली जेणेकरून तो बिबट्या येथून पळून जायला हवा.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथ ऑर्डनन्स भागात वाघ/बिबट्या आढळला होता.त्यामुळे हा परिसर त्यालाच लागून असल्याने बिबट्याचा वावर असेल हे नाकारता येणार नाही.
*मवनविभाग मुख्य अधिकारी प्रमोद ठक्कर* यांनी अशी माहिती दिली की आता सकाळी तो खरोखर आला होता का हे त्याच्या पावलांचे ठसे आम्ही तपासू व त्यावरून शोधमोहीम करायची का निर्णय घेऊ .
वनविभाग अधिकारी *खरे* यांनी आश्चर्य व्यक्त केले की बिबट्या आशा घनदाट वस्ती परिसरात येणे शक्य नाही.परंतु माणसाचे जीवन अनमोल आहे त्यामुळे त्या बालिकेने दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही आमचे गस्तीपथक रात्रभर इकडे ठेवणार आहे.मात्र नागरिकांनी अफवा पसरवून लोकांमध्ये भीती पसरवू नये.
कारण अनेकांनी वाघ जंगलात फिरतोय तसेच वाघ व कुत्रा यांची झटापटीचे व्हिडीओ व्हायरल केले आहे. *वाघ आणि बिबट्या* यात खूप फरक आहे.
वनविभाग आपले काम चोख पाडेल आपण फक्त योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवा.सर्व वनविभाग अधिकारी वायले,दरेकर, खरे तसेच प्रमुख ठक्कर तसेच स्थानिक तरुणांनी अहोरात्र मेहनत घेतली व.जनतेला सावध केले.
उडान सामाजिक संस्था चे अध्यक्ष
महेंद्र अहिरे यांनी
आनंदी हिची मुलाखत (फोनद्वारे) घेतल्यावर महेंद्र अहिरे प्रत्यक्ष काल तिकडे हजर होते
तसेच सुनीता शिवराज अंभोरे यांनी देखील वाघ काल दुपारी 3 वाजता बघितला असल्याचा दावा यांच्याशी फोनवर बोलताना केला आहे.
जनहित न्यूज महाराष्ट्र ने महेंद्र अहिरे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली की वाघ पाहिला ती मुलगी लहान असल्याने वनविभाग अधिकारी सकाळी पायाचे (निशाण) ठस्से शोधणार असून सत्य परिस्थिती समोर येईल
तरी नागरिकांनी सावधानता बाळगावी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद