मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध कलाकार शरद टोहके यांचं साहित्य क्षेत्रात पहिलं पाऊल

मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध कलाकार शरद टोहके यांचं साहित्य क्षेत्रात पहिलं पाऊल
( प्रतिनिधी आशा रणखांबे ) 
 मुरबाड तालुक्यातील अभिनेता कवी लेखक असलेले शरद नामदेव टोहके यांचा रेशीमबंध हा पहिलाच कथासंग्रह दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शरद टोहके यांच्या अनेक कथांना पारितोषिक मिळाले आहेत तर युवा कलागौरव या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. युवा वर्गातील पहिल्याच लेखकाचा हा प्रयत्न नवीन लेखकांना प्रेरणादायी असेल असे मत यावेळी बोलताना  मान्यवरांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. प्रदीप ढवळ , सुप्रसिद्ध अभिनेता विकास महाजन  , लेखक मोहन पाटील , चित्रपट दिग्दर्शक एकनाथ देसले , रंगकर्मी सुधीर चित्ते, गणेश वारघडे, अविनाश भोईर, कवी नवनाथ रणखांबे, गिरीश कंटे ,  योगेंद्र बांगर तसेच तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत माळी यांनी केले तर  सूत्रसंचालन भालचंद्र गोडांबे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार