सिंधुदुर्गात रंगणार आता कोकण चित्रपट महोत्सव – २०२२

सिंधुदुर्गात  रंगणार आता कोकण चित्रपट महोत्सव – २०२२ 
*मुंबई प्रतिनिधी - गणेश तळेकर*
 कोकणातील निसर्ग आणि तिथल्या पारंपारिक कला या महाराष्ट्राची कलासंस्कृती उंचावणाऱ्या आहेत. जागतिक पातळीवर कोकणाचा हा   सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदि मंडळी एकत्र येत ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या   संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे ९ मे ते १४ मे या कालावधीत पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन होणार आहे. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात हा महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाची रूपरेषा व नामांकन प्राप्त चित्रपट व विजेत्यांची नावांची घोषणा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील निसर्गसौंदर्य व सांस्कृतिक वैभव सर्वदूर पोहचविण्यासोबत इतरत्र काय सुरु आहे याची जाणीव स्थानिकांना व्हावी,  स्थानिक कलाकारांना वाव मिळावा यासाठी हा पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केल्याचे ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ संस्थेचे अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांनी यावेळी सांगितले.  
 
या महोत्सवात चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या दिग्ग्ज कलावंतांचा सन्मान केला जाणार आहे. या निमित्ताने या दिग्ग्जांचे आशीर्वादरूपी पाठबळ या महोत्सवाला लाभातील व आमच्यासाठी ते प्रेरणादायी असतील असं सांगत लेखक-दिग्दर्शक विजय राणे यांनी हा महोत्सव कलासृष्टीला वेगळ वळण देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

झी’ टॉकीज ने नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमांचे नेहमीच स्वागत केले   आहे. पहिल्यांदाच होणारा हा कोकण चित्रपट महोत्सव कलासृष्टीला व पर्यटनाला चालना देणारा असेल व यातून अनेक चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात हे लक्षात घेऊन झी’ टॉकीजने या महोत्सवासाठी पुढाकार घेतल्याचे  झी च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर श्री.बवेश जानवलेकर यांनी सांगितले. या महोत्सवाची रूपरेषा पुढील प्रमाणे....

कोकण चित्रपट महोत्सव - २०२२

या चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ९ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता वीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे होईल. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री उदय सामंत या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे सलग ४ दिवस रोज तीन चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जातील या चार दिवसांत अंदाजे २५ ते ३० हजार प्रेक्षक हजर रहातील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ दिनांक ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या ८ तालुक्यात ४ दिवस दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आलेले १४ चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जातील. दिनांक १२ मे रोजी वेंगुर्ले येथे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत.

चित्रपट महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्गात मामा वरेरकर नाट्यगृहात १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता होईल.

महोत्सवासाठी निवडण्यात आलेले चित्रपट आणि घोषित पुरस्कारांची यादी पुदील प्रमाणे 

घोषित पुरस्कार*
कथा- रमेश दिघे- फनरल
पटकथा-रमेश दिघे- फनरल
संवाद - संजय पवार- रिवणावायली
गीतकार- गुरु ठाकूर-नवा सुर्य- फिरस्त्या
ध्वनी मुद्रक- सत्यनारायण-प्रवास
ध्वनी संयोजन- परेश शेलार- जीवनसंध्या.
वेशभुषा- अर्पणा होसिन- कानभट्ट
रंगभुषा- संजय सिंग- कानभट्ट
कलादिग्दर्शक- सतीश चिपकर- कानभट्ट
पार्श्व संगीत- चिनार- महेश- चोरीचा मामला
संगीत- अतुल भालचंद्र जोशी- जीवनसंध्या
गायक पुरुष- आर्दश शिंदे- नवा सुर्य- फिरस्त्या
गायक (स्त्री) - अंजली मराठे  आल्या दिसा मागे - रिवणावायली
संकलक- निलेश गावंड- फनरल
छायाचित्रकार- संजय मेमाणे- हिरकणी
नृत्य दिग्दर्शक- विट्ठल केळेवाली- पांडू

 
सर्वोत्कृष्ट बालकलाकार*
रणवीरसिंग राजे गायकवाड - भारत माझा देश आहे
देवांशी सावंत- भारत माझा देश आहे
रुचित निनावे- पल्याड
ऋग्वेद मुळे- कानभट्ट
मृणाल जाधव- मी पण सचिन

विशेष पारितोषिक*
अशोक सराफ
किशोरी शहाणे
मोहन जोशी
पद्मिनी कोल्हापुरे

उत्कृष्ट १४ चित्रपट*
जीवनसंध्या
फनरल
कानभट
भारत माझा देश आहे
८ दोन ७५
पल्याड
हिरकणी
प्रितम
प्रवास
मी पण सचिन
सिनियर सिटीझन
रिवणावायली
फिरस्त्या
शहिद भाई कोतवाल
सिनेसृष्टीशी  संबंधित पत्रकार,छायाचित्र पत्रकार हे या उद्योगक्षेत्रात महत्त्वपूर्ण भाग आहेत! त्यांनाही अशा उपक्रमात जोडून  घ्यावे,केवळ पुरस्कारासाठी नाही तर चांगले समीक्षक पत्रकार  हे उत्तम  लेखक आणि इतर कलागुणांनी समृद्ध असतील त्यांनाही संधी मिळाली तर चांगले परिणाम दिसतील अशी विनंती वरिष्ठ पत्रकार  शीतल करदेकर यांनी केली
आयोजकांनी या सूचनेचे स्वागत केले

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार