म न से चे वतीने महावितरण कार्यालय समोर आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उल्हासनगर यांच्या वतीने
महावितरण कार्यालय, उल्हासनगर -३. या ठिकाणी security deposit bill व load shedding विरोधात आंदोलन करून security deposit बिलांची होळी करण्यात आली
 व सदर जबरदस्ती लादण्यात आलेले security deposit bill व load shedding त्वरित रद्द करावीत असे पत्र देऊन महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
महावितरण यांनी उल्हासनगरकर यांच्यावर लादलेले सिक्युरिटी डिपॉजिट बिल आणि लोडशेडिंग विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चे वतीने दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी साईबाबा मंदिर जवळील कल्याण अंबरनाथ रोड उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करण्यात आले तसेच वीज बिलांची होळी केली 
तसेच महावितरण अधिकारी यांच्याशी चर्चा करून उल्हासनगरमध्ये नागरिकांना महावितरणचे अधिकारी व कर्मचारी हे वीज ग्राहकांना सविस्तर मार्गदर्शन न करता दादागिरीच्या भाषेत बोलतात यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून होत असलेला त्रास व लोडशेडींग मुळे नागरिकांचे होत असलेले हाल त्यातच सिक्युरिटी डिपॉजिट बिलाची वाढीव रक्कम भरणा करण्यासाठी देण्यात आलेली बिले या विषयावर निवेदन पत्राद्वारे लेखी देण्यात आले व नागरिकांना होत असलेल्या तक्रारी संदर्भात चर्चा करण्यात आली या वेळी
मनसे शिष्ट मंडळ जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, उपजिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे, उपजिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शहर सचिव शालीग्राम सोनवणे, शहर संघटक मेनुद्दीन शेख, शहर उपाध्यक्ष शैलेश पांडव,शहर उपाध्यक्ष सुभाष हटकर, शहर उपाध्यक्ष मुकेश शेठपलानी व इतर पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक तसेच महिला पदाधिकारी तसेच सामान्य जनता उपस्थित होती.
       ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी 
                     संपर्क 9960504729
   22 एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार