स्वर वंदना द्वारे कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार,आशालता वाबगावकर यांना अविस्मरणीय मानवंदना

स्वर  वंदना द्वारे  कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार,आशालता वाबगावकर  यांना  अविस्मरणीय मानवंदना
   कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर या संगीत नाट्य  क्षेत्रातील दिग्गजांना श्री. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग च्या सहकार्याने आयोजित *स्वर वंदना* या कार्यक्रमाद्वारे  नुकतीच  *सांगीतिक  मानवंदना* देण्यात आली! 

 रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील *पु ल *देशपांडे* अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील थिएटर मध्ये आयोजित या कार्यक्रमास 

 श्री गोपीनाथ सावकार स्मृती  विश्वस्त निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ,
धी गोवा हिंदू असोसिएशनचे  अध्यक्ष अनिल पै काकोडे ,चेअरमन डॉ.अशोक आमोणकर  , कार्यकारिणी सदस्य सुरेश पालेकर,सचिव भूषण जॅक,

ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष डॉ.अजित गुंजीकर, समिती सदस्य सुनील रेगे, मिलिंद राजाध्यक्ष, दीपक पंडित, सुभाष कामत,
 क्रिकेटपटू रवी मांद्रेकर, जान्हवी पणशीकर, तरंगिणी खोत, मुकुंद सराफ, सुनील उल्लाळ,  चित्रा नाबर - केरकर, अभय कुलकर्णी, शरद विचारे ,दीपक पडते,रविंद्र ढवळे, विश्वास महशब्दे, शीतल करदेकर आदी दिग्गज तसेच मोठ्या संख्येने चाहता वर्ग  उपस्थित होता! 
  आशालता  यांची 'अर्थशून्य भासे मज हा' (मत्स्यगंधा)आणि  'वद जाऊ कुणाला शरण'(सौभद्र) मानसी फडके ,'तु सुखकर्ता तु दु:खहर्ता' (आरती) आणि  'तव भास अंतरा' (मत्स्यगंधा) नुपूर गाडगीळ यांनी सादर केली. 
 पं. रामदास कामत यांची   'श्रीरंगा कमला कांता'(होनाजी बाळा) , 'स्वकर शपथ  वचनी वाहिला' (संशयकल्लोळ), 'तम निशेचा सरला'(ययाती आणि देवयानी) 'देवाघरचे ज्ञात कुणाला '( मत्स्यगंधा ) ही गाणी धनंजय म्हसकर यांनी सादर केली. 
 तर 'चंद्रिका ही जणू' (मानापमान), 'कोण तुजसम सांग मज गुरूराया' (सौभद्र) ,  'गोय तुझी याद येता'(कोकण गीत)निनाद जाधव यांनी सादर केली!                        
  किर्ती शिलेदार  यांची गाणी 'मजवरी तयाचे प्रेम खरे'( संशयकल्लोळ)मानसी फडके,'अगा वैकुंठाच्या राया'(कान्होपात्रा )मानसी फडके आणि
जोहार मायबाप जोहार (कान्होपात्रा )व  'हे सुरांनो चंद्र व्हा' (ययाती आणि देवयानी) नुपूर गाडगीळ यांनी सादर केली.

अतिशय चपखल व उत्तम  नाट्यगीत  सादरीकरणाने  या तीनही दिग्गजांच्या आठवणींना उजाळा मिळाला;  तो  सुभाष सराफ यांच्या  अभ्यासपूर्ण ओघवत्या निवेदनाने  आणि  राजेंद्र भावे ( व्हायोलिन) ,सुहास चितळे( तबला) ,ओमकार अग्निहोत्री( हार्मोनियम ) यांच्या अचुक वाद्यसाथीने ! आठवणीने बहरलेली   ही *स्वरवंदनेची* संध्याकाळ अविस्मरणीय अशी ठरली

गणेश तळेकर मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत