*क्रिकेटर विनोद कांबळी, दिग्दर्शक महेश मांजरेकर, मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्या हस्ते "सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या" नवव्या सीझनचे उद्घाटन

*क्रिकेटर विनोद कांबळी, दिग्दर्शक महेश मांजरेकर, मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्या हस्ते "सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या" नवव्या सीझनचे उद्घाटन.....*

२४ मे रोजी संध्याकाळी सांताक्रूझमधील कलिना येथील एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब ग्राउंडवर 'सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट २०२२' या नवव्या सीझनचे भव्य उद्घाटन करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख आमदार संजय पोतनीस व परिवहन मंत्री महाराष्ट्र शासन डॉ. अ‍ॅडव्होकेट अनिल परब यांच्या पुढाकाराने या टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, हे सामने २८ मे पर्यंत खेळवले जाणार आहेत.
सुप्रीमो ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट २०२२'च्या उद्घाटन प्रसंगी विनोद कांबळी, महेश मांजरेकर, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, नदीम मेमन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात सुरुवातीला श्री गणेशाला भक्तीभावाने वंदन करत नृत्य करण्यात आले. फटाके आणि संगीताच्या तालावर या अनोख्या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजेत्याला देण्यात येणार्‍या गौरवशाली ट्रॉफीचेही अनावरण करण्यात आले.
चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरयावेळी बोलताना म्हणाले की, मी दरवर्षी सुप्रिमो ट्रॉफी सामन्यांसाठी येतो. संजय पोतनीसजी या क्रिकेट स्पर्धेचे उत्तम आयोजन करत आहेत. येथील व्यवस्था पाहून मला आनंद झाला आहे. विनोद कांबळीच्या हस्ते श्रीफळ वाढवून पहिल्या सामन्याची शुभारंभ करण्यात आला. अशा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे ही खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असल्याचे कांबळी म्हणाले. मी आणि सचिननंही (तेंडुलकर) अशाचप्रकारे टुर्नामेंटसची सुरुवात केली होती. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना मी त्यांना सांगू इच्छितो की, मनापासून खेळा, कोणतेही टेन्शन घेऊ नका, खेळ आणि सामन्याचा आनंद घ्या.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी परमटर वैष्णवी (रायगड) हिने शिरसाट स्पोर्ट्स (नगर) विरुद्ध लढत दिली. दुसरा सामना टीडब्लूजे डॉमिनेटर्स (पालघर) आणि रोहित क्रिकेटर्स (वास्को गोवा) यांच्यात रंगला. सुप्रीमो चषक ही भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आहे. हि स्पर्धा २४ मे २०२२पासून सुरू झाली असून, २८ मे २०२२ पर्यंत एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कलिना, सांताक्रूझ येथे सुरू राहणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्वोत्कृष्ट संघांवर बक्षिसांचा वर्षाव होतो आणि स्पर्धेतील खेळाडूंसह सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दरवर्षी कार, मोटार बाईक आणि रोख बक्षिसे दिली जातात.
प्रतिनिधी गणेश तळेकर
जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार