उल्हासनगर महानगर पालिका कर्मचारी पतपेढी निवडणूक २०२२ वादाच्या भोवऱ्यात
उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी निवडणूक परिवर्तन पॅनलचे ९ उमेदवार झाले विजय
उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक २०२२ कर्मचारी पतपेढी चे मतदान दिनांक २० मे २०२२ रोजी पार पडले
उल्हासनगर
महानगरपालिका पतपेढीचे १२६४ सभासद असलेले कर्मचारी यांनी मतदान केले
परिवर्तन पॅनल मध्ये एकूण १३ उमेदवार होते त्या पैकी ९ उमेदवार विजय झाले
विजय झालेल्या उमेदवारा मध्ये अच्युत सासे. विनोद केणे. एकनाथ पवार. दिपक भोये. नरेश परमार. ब्रह्मानंद करोतीया. अनिल राठी. संदीप बिडलान. आशा कजानीया. हे परिवर्तन पॅनल चे नऊ उमेदवार विजयी झाले
तसेच सिद्धांत पॅनल चे. जयश्री साठे.मनोज जाधव. विजय झाले आहेत
कामगार एकता पॅनल मधून विजय बेहनवाल. दीपक दाभने . विजय झाले आहेत.
सर्वसाधारण अपक्ष उमेदवारांना बलाढ्य असलेल्या पॅनल ने जिंकण्याची संधी दिली नाही
सर्वसाधारण अपक्ष उमेदवारांचा सफेद रंगाचा बॅलेट पेपर यावर ५० उमेदवारांना एकत्र ठेवले आणि सफेद रंगाच्या बॅलेट पेपर वर मतदारांनी फक्त ८ सिक्के मारावे ८ शिक्क्या पेक्षा जास्त झाल्यास मतपत्रिका बाद ठरविली जाईल अश्या अटी व नियम लागू केले
सफेद रंगाच्या मतपत्रिकेवर ५० उमेदवार असल्याने बहुतांश सफाई कर्मचारी यांना मतदान करताना मतदान कसे करावे हे समजले नाही
यामुळे सफेद रंगाचा बॅलेट पेपर भारी प्रमाणात अवैध ठरविण्यात आला
या मुळे सर्वसाधारण अपक्ष उमेदवार यांना विजय प्राप्त करण्याची संधीच मिळाली नाही
सन १९८५ पासून उल्हासनगर महानगरपालिका मध्ये उदयास आलेल्या पतपेढी निवडणूकीची रणधुमाळी २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने पॅनल मधील उमेदवारांचे धाबे दणाणले होते
२० मे २०२२ रोजी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी मतपत्रिका टाकण्याच्या बॉक्सवर छत्री चे चिन्ह आढळल्याने उमेदवारांमध्ये खळबळ उडाली उमेदवारांच्या प्रतिनिधींनी छत्रीच्या चिन्हाची बाब निवडणूक अधिकारी परब यांच्या लक्षात आणून दिली व त्वरित छत्रीचे चिन्ह असलेले सर्व बॉक्स हटविण्यात आले व त्याच ठिकाणी दुसरे बॉक्स ठेवून मतदानाला सुरुवात झाली
निवडणूक अधिकारी परब हे परिवर्तन पॅनल शी संगनमत करीत आहेत का ?
असा संशय प्रतिनिधी आणि उमेदवार यांनी व्यक्त केला
कामगार युनियन संघटना चे राधाकृष्ण साठे. ज्येष्ठ नेते चरणसिंग टाक. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे युनियन अध्यक्ष दिलीप थोरात तसेच कर्मचारी व उमेदवार मनोज जाधव. यांनी संताप व्यक्त केला
तसेच उमेदवार कांता नोतानी यांच्या गैरहजेरीत मत मोजणी करून कांता नोतानी याना हरविन्यात आले आहे अशी तक्रार कांता यांनी केली आहे
बॉक्स वरील छत्री चे चिन्ह बालाजी चटाका पटाका ह्या खाद्यपदार्थ विक्री करीत असलेल्या कंपनीचे होते
बॉक्स व आतील खाद्यपदार्थ पावसाच्या पाण्याने सुरक्षित रहावे याच्या सूचना बॉक्सवर लिहिल्या होत्या व छत्रीचे चित्र आणि पावसाळी ढगाचे चित्र दिसत होते
छत्रीचे चित्र खाद्यपदार्थ विक्री करीत असलेल्या कंपनीने टाकले असले तरी सुध्दा मतदान निवडणूक अधिकारी यांनी दक्षता बाळगणे गरजेचे होते
उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी मध्ये लाखो रुपया पेक्षा अधिक नफा दिसत असतानाही मतदान कक्ष या ठिकाणी वापरत असलेल्या बॉक्सवर साधा कागद लावून त्यावर मतपेटी लिहता आले नाही का ?
हा प्रश्न हार पत्करलेल्या उमेदवारांना पडला आहे
अनेक उमेदवार तक्रारी करीत आहेत त्या पैकी प्रवीण चिकणकर यांनी कोर्टात. धाव घेतली असून उल्हासनगर महानगरपालिका पतपेढी मध्ये वकिलामार्फत दिनांक २३/०५/२०२२ रोजी नोटीस देण्यात आली आहे
सदर नोटीस मध्ये प्रवीण चिकनकर यांनी त्यांच्या मता ची मोजणी पुन्हा करावी अशी मागणी केली आहे
उल्हासनगर महानगरपालिका कर्मचारी पतपेढी
निवडणुकीच्या ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रात जाण्यासाठी दिशा निर्देश फलक लावण्यात येत असतात परंतु या ठिकाणी कोणतेही फलक लावण्यात आले नाही
अश्या अनेक तक्रारी मतदार व उमेदवार यांनी केल्या आहेत
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद