आई वालधुनी नदीचे स्वागत पूजन आणि नदीला साडी अर्पण...
आई वालधुनी नदीचे स्वागत पूजन आणि नदीला साडी अर्पण...
अंबरनाथच्या तावली डोंगरातून उगम पावून बोहनोली गावातून जीआयपीआर धरणाला जोडून केवळ पावसाळ्यातच वाहणाऱ्या वालधुनी नदी मातेचे स्वागत करत खणा नारळाने ओटीभरण, नदीपूजन झाले,
वालधुनी नदी मातेला सात रंगाच्या सात साड्या प्रतीकात्मक अर्पण केल्या गेल्या. त्या साडया नदीच्या रक्षणकर्त्या गावकरी भगिनींना समर्पित केल्या गेल्या.
शुक्रवार, 27 मे रोजी सायंकाळी अंबरनाथ, काकोळे गाव रस्त्यावरील पाईपलाईन वृक्षारोपणाच्या ठिकाणी 35 मीटरच्या साड्या नेसवुन सोळा श्रृंगार करून अभिषेक व पूजाही करण्यात आली, यानंतर जुना अंबरनाथ गाव येथील समाजसेवक श्री शिवादादा पाटिल यानी अर्पित केलेल्या 7 रंगांच्या 7 साड्या गावातील 7 भगिनींना समर्पित केल्या गेल्या,
वालधुनी नदी संवर्धन समितीच्या वतीने महाराष्ट्राच्या इतिहासात हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी राबवला गेला.
ह्या प्रसंगी काकोले ग्रामस्थ, उपसरपंच, अर्पण योगा केन्द्रच्या महिला, मातोश्री प्रतिष्ठान कार्यकर्ते, अंबरनाथ नपा अधिकारी व अनेक नदिप्रेमी उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद