जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या मार्गदर्शन सभेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या मार्गदर्शन सभेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
उल्हासनगर : जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती ची मार्गदर्शन सभा दि. १९ जून २०२२ रोजी उल्हासनगर , आनंद नगर फर्स्ट गेट येथील आंबेडकर भवन येथे आयोजित करण्यात आली मार्गदर्शन सभा मोठ्या उत्साहात व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली
ह्या सभेत उल्हासनगर शहर कार्यकारिणी व इतर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या
या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रात कार्यरत अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली व नवनियुक्त पदाधिकार्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी उत्तम प्रकारे मार्गदर्शन ही केले उल्हासनगर परिवहन विभागाचे उपनिरीक्षक जगदीश मोकल यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ दिला व उपस्थितांना बहुमूल्य मार्गदर्शन केले
सामाजिक प्रतिष्ठान चे सचिव समाधान प्रधान, सल्लागार दिपक मोरे तसेच ज्येष्ठ समाजसेवक गौतम ढोके , समाजसेवक महेंद्र रणपिसे, समाजसेवक विनोद सोनावणे, अशोक खवले, प्रदीप उमाप, संजय शर्मा, शिक्षक दिनेश साठे , राजेश चव्हाण , ज्येष्ठ पत्रकार व आनंद वैभव चे संपादक मधूकर आयरे, ज्येष्ठ पत्रकार व भारत न्युज चे संपादक डॉ. साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार व जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट , तसेच कोल्हापूर चे प्रसिद्ध उद्योगपती रमेश पाटील समेत अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी १३८ गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले
धनदिप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समिती च्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सौ. यमुताई अवकाळे ( पाटील ) , जे.के.सी चे सदस्य व अंबरनाथ येथील साईबाबा सेल्स चे संचालक मुरली पंजाबी व जे.के.सी च्या सदस्य व शिक्षिका अमिता देशमुख यांनी गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे शालेय साहित्य उपलब्ध करून दिले त्याबद्दल जे.के.सी मानवाधिकार रक्षण व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्यामभाऊ जांबोलीकर, राष्ट्रीय सरचिटणीस दिपक साठे सर व संपूर्ण टिम ने त्यांचे कौतुक करून मनोभावे आभार मानले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साठे यांनी केले तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शरद घुडे यांनी परिश्रम घेतले
प्रतिनिधी हर्षद पठाडे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद