आरक्षण विरोधी पक्षाच्या सशक्त पर्याय उभारणार बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या बैठकीत निर्धार

आरक्षण विरोधी पक्षाच्या सशक्त पर्याय उभारणार बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या बैठकीत निर्धार
नागपूर : राज्यातील चारही महत्त्वाचे पक्ष हे आरक्षण विरोधी आहेत. यांनी बहुजन समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी शेकली आहे. येणाऱ्या निवडणुकीत या प्रमुख राजकीय पक्षाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्यासाठी बहुजन समाजातील राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या ५० प्रतिनिधींची बैठक रवी भवनात पार पडली. बैठकी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवून प्रस्थापितांना धक्का देण्याचा निर्धार करण्यात आला कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे. यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या बैठकीला मार्गदर्शक म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड. माजी आमदार उपेंद्र शेंडे. प्रा एन व्ही ढोके.रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय सरचिटणीस देशक खोब्रागडे. जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोकराव आल्हाट. कम्युनिस्ट पार्टीचे अरुण बनकर. गोंडवाना गणतंत्र पार्टीचे हरीश ऊईके. भीम आर्मी चे संजय फूलझेले. भाऊसाहेब बावणे. जनार्दन मून. रा स्व सं चे प्रा रमेश राठोड. प्रा मनीष वानखेडे. राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ सुषमा भड. राष्ट्रीय समाज पक्षाचे दता जी मेश्राम. दताजी मडावी. गोंडवाना पार्टी चे जीवन बागडे. रिपब्लिकन पार्टीचे अतुल खोब्रागडे. सुनील चोकरे. विदर्भ विचारमंच चे गणेश फुलसुंगे. राष्ट्रीय जनता दलाचे सिद्धार्थ मरार. समता सैनिक दलाचे अशोक पाटील. तसेच विदर्भ पार्टी समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते .... यावेळी बोलताना हरिभाऊ राठोड म्हणाले की अन्यायातून निर्माण झालेली आमची ही लोकशाही आघाडी आहे राज्यातील सरकारने आरक्षणाचे प्रश्न सोडविले नाहीत राजकीय पक्षाच्या ओठात एक व पोटात एक असे असल्याने समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे बहुजन समाजातील सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्ष एकत्र येऊन आम्ही पर्याय निर्माण करणार आहोतअरुण गाडे यांनी बाबासाहेबाना अभिप्रेत असलेला राजकीय विचारधारा म्हणजे संविधानाचे समता बंधुत्व न्याय या तत्त्वावरच रिपब्लिकन पक्षाचे ध्येय धोरण राबविल्यासच वंचितांना न्याय मिळेल देशात समता प्रस्थापित होईल. वैभव प्राप्त होईल असे मत व्यक्त केले.. अशी माहिती जनहित लोकशाही पक्षाचे अशोकरावं आल्हाट यांनी दिली
ब्युरो रिपोर्ट जनहित सेवा महाराष्ट्र 
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार