सौ.सुवर्णा साळुंके व सुभाष साळुंके आयोजित श्रावण_उत्सव_२०२२ अंबरनाथ मध्ये संपन्न
सौ.सुवर्णा साळुंके व सुभाष साळुंके आयोजित श्रावण_उत्सव_२०२२ अंबरनाथ मध्ये संपन्न
मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन, विकासकामांसोबतच युवक व महिला सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने झटणारे दांपत्य म्हणून सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांची ओळख,
पाणी वाचवा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ओला सुका कचरा वेगळा वेगळा करणे, गटारात कचरा न टाकता घंटागाडी चा वापर, झाडे लावा- झाडे जगवा, मुलगी वाचवा–मुलगी शिकवा, देशाभिमान इत्यादी विषयांवर आधारित मंगलागौरी खेळाचे उत्कृष्ठ सादरीकरण संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांच्या ग्रुपने केले.
यावेळी पारमार्थिक भजन क्षेत्रात महिलांना एकत्रित करून केले, अनेक वर्ष महिला भजन सादरीकरण करण्याऱ्या १० महिला भजन मंडळ संचालिका
मा. वैशाली मिरकुटे,श्रीमती नंदा पारसी,
सौ. सुहासिनी सकपाळ, सौ. नयना पार्टे , सौ.निशा घरत, सौ.जयश्री उतेकर इ.चा सन्मान
तसेच विशेष प्राविण्य प्राप्त
क्रिडा प्रकारामध्ये कु.सावनी नंदकुमार कबरे,
नृत्य प्रकारामध्ये कु.श्रावणी संजय पलंगे,
तबला वादन कु.दिवेश अनिल पाटील व दुबई येथील स्पर्धेत मेडल विजेती कु. मेघा विलास कामत, इत्यादींचा सन्मान मान चिन्ह,शाल व तुळशी चे रोप देऊन
महिला सक्षम व सबळ व्हावी, तिचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, याविषयी मा.उषा मजेठीया यांनी
तसेच महीला बचत गट फायदे, महिला उद्योग व व्यवसाय याविषयी लातूर वरून निमंत्रित केलेले
श्री.सुर्यकांत घुले यांनी मार्गदर्शन केले.
आपली हिंदू संस्कृती व परंपरा जमिनीच्या दृष्टीने जपण्याच्या दृष्टीने श्रावण उत्सवामध्ये मंगळागौरी चे खेळ सादर झाले तसेच श्रावण वाण,भेट म्हणून महिलांसाठी उपयुक्त किचन_ॲपरन (kitchen apparon) चे वाटप केले.
#कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना संवाद फाऊंडेशन व नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांच्या सहकार्याने घरकाम करणाऱ्या महिला तसेच गरजू, गरीब महिला, ज्येष्ठ नागरिक , विद्यार्थी इत्यादीकरिता विविध प्रकारचे उपक्रम, प्रशिक्षण शिबिरे, कार्यक्रम राबवित असल्यांचे संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. पद्मा देशपांडे व प्रा. यास्मिन शेख यांनी उत्तमरित्या केले.
कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा बनसोडे, महिला उपशहर संघटक सौ. लिना सावंत, माजी नगरसेविका सौ. लतिका कोतेकर, सौ.सुप्रिया देसाई, सौ.शिल्पा नाचरे, सौ.सुषमा रसाळ ,सौ.अनिता लोटे, मा.नगरसेवक रविंद्र पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.
४०० हून अधिक महिलांनी उपस्थिती राहून मोठ्या उत्साहात श्रावण उत्सव कार्यक्रमाचा आनंद लुटला.यावेळी १५० महिलांनी मेहंदी सजावट करून घेतली.भारदस्त व उत्कृष्ट आयोजनाबद्दल संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके व मा.नगरसेवक सुभाष साळुंके यांचे मान्यवरांनी कौतुक केले तसेच महिलांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजकुमार जमखंडीकर, चंद्रकांत फाळके, विलास शेट्ये,संकेत पार्टे,सुनिल देशपांडे, दिपक विशे,वैशाली व नंदू शेलार,आशाताई शेकोकारे, मनीषा मसणे, सुनंदा मांढरे,नंदा देशपांडे, सिध्दी शेलार,सुनीता रघुनाथन, पौर्णिमा शिंदे इ.नी परिश्रम घेतले.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र अंबरनाथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद