सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. या निमित्तानं स्वातंत्र्यपूर्व काळातील आठवणींसोबतच क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जात आहे. याच काळात समाजात वैचारिक क्रांती घडवत काही थोर मंडळींनी सुसंस्कृत समाजाच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं आहे. साने गुरूजींसारख्या शिक्षकी पेशा असणाऱ्या अवलियानं आपल्या प्रत्येक वर्तणुकीतून समाजाला धडे देण्याचं, शिकवण्याचं काम केलं आहे. आता हेच साने गुरुजी रुपेरी पडद्याच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'श्यामची आई' या आगामी मराठी चित्रपटात,
अमृता फिल्म्स ने निर्मिती केली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासानं पछाडलेला, तसंच बरेच पुरस्कार पटकावणाऱ्या तरुण दिग्दर्शक सुजय डहाकेनं 'श्यामची आई'चं दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच या चित्रपटातील साने गुरुजींचा फर्स्ट लुक रिव्हील करणारं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये बनवण्यात आलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कृष्णधवल युगात घेऊन जाणार आहे. या चित्रपटातील तीनही गाण्यांना संगीत देण्याची जबाबदारी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद