पीडब्ल्यूडीच्या शाखा अभियंत्याचा प्रतापमलबार हिल सेवा केंद्रात बेकायदा कर्मचा-यांची घुसखोरी

पीडब्ल्यूडीच्या शाखा अभियंत्याचा प्रताप
मलबार हिल सेवा केंद्रात बेकायदा कर्मचा-यांची घुसखोरी

मुंबई ; संगणकीय कामासाठी एखादा कर्मचारी नेमण्याचा अधिक असताना मलबार हिल सेवा केंद्रातील शाखा अभियंत्याने आपल्या कार्यालयात एका तरुणीसह चार 
कर्मचा-यांची बेकायदा भरती-नियुक्ती केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
त्या शाखा अभियंत्याचे नाव ओमप्रकाश पवार असे आहे. त्यांनी केलेल्या नियमबाह्य आणि अनावश्यक नियुक्त्यांमुळे सरकारच्या पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे, अशी तक्रार करतानाच त्या नियुक्त्या त्वरित रद्द कराव्यात, 
अशी मागणी बहुजन संग्रामने केली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वज्निक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता आर. आर. हांडे यांना निवेदने सादर केली आहेत.
शाखा अभियंता ओमप्रकाश पवार यांनी 1) विर्झा पवार 2) खाजगी सुरक्षारक्षक लाला 3) ड्रायव्हर अशोक 4) नितीन वाघचौरे या चार कर्मचा-यांची भरती/नियुक्ती केली आहे. पवार यांनी त्यांच्या कार्यालयातील वैशाली माळकर या कर्मचारी महिलेला हटवून विर्झा पवार हिची वर्णी लावली आहे. ती यापूर्वी वरळी बीडीडी चाळ उपविभाग, सेक्शन : सी येथील कार्यालयात ओमप्रकाश पवार यांच्यासोबत कार्यरत होती, अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
विर्झा पवार हिला स्वतंत्र वातानुकूलित दालन पुरवण्यात आले अहे, तर नितीन वाघचौरे याला सरकारी निवासस्थानही वितरित करण्यात आले आहे.
‘कॉन्ट्रॅक्टर’ वडिलांच्या आजाराची बोगस बिले
शाखा अभियंता ओमप्रकाश पवार यांचे वडील अंकुश पवार हे  सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दफ्तरी ‘अनलिमिटेड कॉन्ट्रॅक्टर’ आहेत. तरीही शाखा अभियंत्यांनी वडिलांच्या आजारपणाची बोगस बिले सादर करून सरकारी तिजोरीवर डल्ला मारला आहे, असा आरोप भीमराव चिलगावकर यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.
बढतीनंतरही उपअभियंत्याला त्याच उपविभागात नियुक्ती
सरकारी सेवेत बढतीनंतर अधिकारी-कर्मचा-यांची अन्यत्र बदली केली जाते. पण हा नियम धाब्यावर बसवून पीडब्ल्यूडीचे हाजी अली येथील शाखा अभियंता सुरेश डावखर यांनी त्यांच्या कार्यालयाचा समावेश असलेल्या मलबार हिल उपविभागातच उपअभियंता पदावरील बढतीनंतर नेमणूक मिळवली आहे, असा गौप्यस्फोट बहुजन संग्रामच्या निवेदनात करण्यात आला आहे. डावखर यांनी शाखा अभियंता असताना हाजी अली शाखेत अनेक बोगस कामे कागदोपत्री दाखवून सरकारी तिजोरीची ‘लयलूट’ केल्याच्या तक्रारी आहेत. त्या पाश्र्वभूमीवर आपल्या बेसुमार भ्रष्टाचारावर पांघरुण घालण्यासाठीच त्यांनी मलबार हिल हे कार्यक्षेत्र हस्तगत केले आहे, असा आरोप करताना त्यांची तिथून त्वरित उचलबांगडी करण्यात यावी. तसेच त्यांनी हाजी अली शाखेत केलेल्या बोगस कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,
 अशी मागणी बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी केली आहे.स्वच्छतेचे आव्हान रवींद्र चव्हाणांना पेलवेल ?
सार्वजनिक बांधकाम खाते ‘स्वच्छ’ करण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला पाठवले आहे,’ असे प्रतिपादन त्या खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राष्ट्रीय अभियंतादिनी अभियंत्यांच्या राज्यव्यापी कार्यशाळेत बोलताना नुकतेच केले आहे. मात्र पीडब्ल्यूडी खात्यात अभियंत्यांची मनमानी, बेसुमार भ्रष्टाचार आणि सरकारी तिजोरीची होणारी लयलूट पाहता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोरील स्वच्छतेचे आव्हान मोठे मानले जाते. त्यामुळे हे आव्हान त्यांना कितपत पेलवेल, याबाबत कर्मचारीवर्गात साशंकता व्यक्त केली जात आहे. अशी माहिती भीमराव चीलगावकर यांनी दिली 
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार