उल्हासनगर महानगरपालिका पर्यावरण विभाग मार्फत जाहिर अवाहन
उल्हासनगर महानगरपालिका पर्यावरण विभाग मार्फत जाहिर अवाहन
शहर हद्दीतील सर्व फटाके विक्री करणारे व्यावसायिक व फटाके वापर करणारे नागरिक यांना आवाहन करण्यात येते की भारत सरकार आधीसूचना G.S.R 682 ( E ) दिनांक 05.10.1999 अन्वये 125 dB ( A ) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट. लिथियम आर्सेनिक. मर्क्युरी. यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे या घटकामुळे विषारी वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहे. तसेच जनहित याचिका क्र.152/ 2005 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटका विक्रेत्यांनी विस्फोटक व आधीनियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तरी फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही आहे
महाराष्ट्र शासन माजी वसुंधरा अभियान 3.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानांतर्गत फटाके मुक्त. प्लास्टिक मुक्त. कचरा मुक्त. प्रदूषण मुक्त. व पर्यावरण पूरक ( ग्रीन फेस्टिवल ) सण उत्सव साजरे करावेत सदर अभियानांतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा.प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. सणसमारंभ मध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करावा पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी
असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख उल्हासनगर महानगरपालिका यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद