सौ. आशा नवनाथ रणखांबे यांची जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती सदस्य पदी निवड

सौ. आशा नवनाथ रणखांबे यांची जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती सदस्य पदी निवड
 जिल्हास्तरीय महिला दक्षता  समिती सदस्य पदी आशा नवनाथ रणखांबे यांची निवड 
( ठाणे प्रतिनिधी) 
 ठाणे,  जिल्हास्तरीय  महिला दक्षता  समिती स्थापन करण्यात आली असून   त्यामध्ये  ए. बी. एम. समाज प्रबोधन संचलित आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रम शाळा बाबरे या शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नवनाथ रणखांबे यांची जिल्हास्तरीय  महिला दक्षता  समिती सदस्य पदी निवड झाली आहे.    
   पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांच्या दालनात जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीची  सभा  नुकतीच आयोजित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक  ठाणे ग्रामीण विक्रम  देशमाने,   सचिव  पोलिस उप - अधिक्षक (गृह)  विकास नाईक  ,  एसीपी सुरेश मनोरे  ,  पीएसआय  सुवर्णा  अदक , यांच्या  समवेत एकूण  आकरा  सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. आशा नवनाथ रणखांबे यांनी आदिवासी विभागातून मुलांना  18  वर्षे  निस्वार्थ ज्ञानदानाचे काम केले असून  एक आदर्श अध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच जनहित न्युज महाराष्ट्र या चैनेल मध्ये रिपोर्टर आणि एक उत्कृष्ट निवेदिका म्हणून त्या आपले कर्तव्य बजावत आहेत तसेच त्यांनी  विविध सामाजिक  उपक्रम राबवले असून विविध संस्था आणि संघटनेत त्या कार्यरत आहेत, शैक्षणिक , सामाजिक,  साहित्य कला  संस्कृती या क्षेत्रात त्यांचे काम उल्लेखनीय आहे.  गर्जा कलामंच  मुरबाड यांच्या कडून  जिल्हास्तरीय रणरागिणी पुरस्कारने त्या सन्मानित  आहेत. सामाजिक विविध उपक्रमात  त्यांचा सहभाग  नेहमी असतो.  आशा नवनाथ रणखांबे यांची  जिल्हास्तरीय  महिला दक्षता  समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र जिल्हा ठाणे
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
__________________________________________
बातमी जनहित या साप्ताहिक पेपर मध्ये दिवाळी निमित्त हार्दिक शुभेच्छा जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी फोटो किंवा बॅनर dtp पाठवा पद व नावं व्यवस्थित लिहून पाठवा आपली देणगी Gpay 9960504729 वर पाठवा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार