महिला सुरक्षित तर घर सुरक्षित या अनुषंगाने महिलांसाठी लावण्यात आलेले महाआरोग्य शिबीर संपन्न
महिला सुरक्षित तर घर सुरक्षित या अनुषंगाने महिलांसाठी लावण्यात आलेले महाआरोग्य शिबीर संपन्न
शनिवार दि. 05.11.2022 रोजी लालचक्की चौक, उल्हासनगर -4 या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबीर ठेवण्यात आले. सदर शिबिरात रक्त तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, बी.पी. शुगर, डायबटिज चेकअप, थायरॉईड टेस्ट असे अनेक चाचणी ठेण्यात आल्या होत्या आणि सोबत ABHA कार्ड देण्यात आले ज्यात अनेक सुविधा महिलांसाठी देण्यात येणार आहेत. सदर शिबिरात जवळपास 110 जणांनी लाभ घेत आरोग्य शिबिराचे कौतुक केले. स्त्री ही कुटुंबाचा कना असते आणि आपले कुटुंब सांभाळत स्वतःच्या आरोग्यस तिचे दुर्लक्ष होते. महिला सुरक्षित तर घर सुरक्षित त्यानुषंगाने खास महिलांसाठी सदर शिबीर लावण्यात आले होते असे मनसे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रदिप गोडसे यांनी सांगितले.
सदर शिबिर यशस्वी केल्याबद्दल महापालिका आरोग्य विभाग यांचे मनःपूर्वक आभार..! व त्याचप्रमाणे महिलांनी देखील सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याबद्दल त्यांचे देखील आभार प्रदिप गोडसे यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद