पुण्यात बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुण्यात बेकायदेशीर आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल    पुणे : प्रतिनिधी सुनील वाल्हेकर  

पुण्यात गेले अनेक दिवस दुचाकी टॅक्सी सेवेच्या विरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन सुरु आहे दुचाकी टॅक्सी बंद करण्यात याव्या, या मागणीसाठी पुण्यातील रिक्षा चालक संघटनेने 28 नोव्हेंबर रोजी रिक्षा बंद पुकारला होता. या बंदला इतर रिक्षा संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर पुण्यातील  रिक्षा चालक संघटनेने दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी रिक्षा बंद आंदोलन केले होते. आता या आंदोलनात सहभागी झालेल्या 37 रिक्षाचालक आणि संघटनांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे
पुणे पोलिसांनी  दिलेल्या माहितीनुसार,रॅपिडो बाईक टॅक्सी बंद करण्यासाठी ‘बाईक टॅक्सी विरोधी आंदोलन समिती’ने पुण्यात 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून बेमुदत बंद पुकारला होता. हे बेकायदेशीर आंदोलन करून सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या 37 रिक्षाचालक आणि रिक्षा संघटनांवर कारवाई करत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे
 प्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र पुणे बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या साठी संपर्क साधा
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा