भारतीय बौद्ध महासभा ,चिंचपाडा शाखेची एक दिवसीय पर्यटन धम्म सहल संपन्न

भारतीय बौद्ध महासभा ,चिंचपाडा शाखेची एक दिवसीय पर्यटन धम्म सहल संपन्न
प्रतिनिधी आशा रणखांबे 
कल्याण / ठाणे 
 बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास आणि महत्त्व  बौद्ध  उपासक  - उपासिका अनुयायी  यांना व्हावे. बौद्ध धम्माचे ज्ञान मिळावे  या करता एक दिवसीय पर्यटन धम्म सहलीचे आयोजन करण्याचा उपक्रम  दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा, कल्याण तालुका अंतर्गत   100 फूट रोड, चिंचपाडा शाखा  यांनी आयोजित केला  होता. नालासोपारा येथील सम्राट अशोक   यांच्या कालखंडातील असलेले बौद्ध स्तूप  आणि जागतिक विपशना केंद्र गोल्डन पॅगोडा, गोराई  येथे
 एक दिवसीय पर्यटन धम्म सहल मोठ्या  उत्साहात संपन्न झाली . 
        बौद्ध स्थळांना भेटी देऊन त्यांचा इतिहास आणि महत्त्व  बौद्ध  उपासक  - उपासिका अनुयायी  यांना व्हावे. बौद्ध धम्माचे ज्ञान मिळावे  या करताना एक दिवसीय पर्यटन धम्म सहलीचे आयोजन करण्याचा  स्तुत्य उपक्रम   हाती घेतला त्याबद्दल  जीवनसंघर्षकार फेम, साहित्यिक नवनाथ रणखांबे यांनी  अध्यक्ष रमेश पी. सोनावणे आणि शाखेच्या सर्व पदाधिकारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  
          ही धम्म सहल यशस्वी करण्यासाठी  अध्यक्ष  रमेश पी. सोनावणे,  सरचिटणीस सुमेध ओव्हाळ, कोषाध्यक्ष मिलींद गांगुर्डे , पर्यटन प्रमुख गणेश चाबुकस्वार , संस्कार प्रमुख भीमराव आढाव , महिला प्रमूख  संगीता रामटेके , संघटीका आशा सोनावणे व सुनीता पाटोळे आणि समस्त पदाधिकारी यांनी  मेहनत घेतली . सहलीचे आयोजन आणि नियोजन  शिस्तप्रिय  उत्कृष्ट केले होते . जाण्या येण्याचा प्रवास खर्च , सकाळी चहा-  नाष्टा तसेच दुपारी सुग्रास भोजन व सायंकाळी चहा व बिस्कीट  हे सर्व पर्यटन फक्तं 500 रूपया मध्ये खूप नियोजपूर्वक केले होते.
अशी माहिती कवी नवनाथ रणखांबे यांनी दिली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार