वांद्रे स्टेशनवरील लिफ्टमध्ये अडकलेल्या २० जणांची, रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांनी अर्ध्या तासानंतर सुखरूप सुटका केली
वांद्रे स्टेशनवरील लिफ्टमध्ये अडकलेल्या २० जणांची, रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांनी अर्ध्या तासानंतर सुखरूप सुटका केली
मुंबई लोकलच्या अनेक रेल्वे स्टेशनवर हल्ली लिफ्टची सुविधा दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा त्रास कमी व्हावा म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परंतु त्याच लिफ्ट ने बुधवारी सकाळी २० जणांना काही काळासाठी घाम फोडला. सुमारे २० प्रवासी वांद्रे रेल्वे स्टेशनवरील एका लिफ्टमध्ये अंदाजे अर्धा तास अडकून पडले होते.
पोलिस कॉन्स्टेबल शाहीन पठाण या वांद्रे रेल्वे पोलिस स्टेशनच्या महिला कर्मचारी यांनी योग्य वेळी कर्तव्यतत्परता दाखवून व मदत मिळवून दिली आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले
पश्चिम रेल्वेने दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकातील विविध फलाटावर जाण्यासाठी सरकते जिने आणि लिफ्टची सोय केली आहे. मात्र हीच लिफ्ट प्रवाशासाठी धोकादायक देखील ठरू शकते याची प्रचिती वांद्रे रेल्वे स्थानकात प्रवाशांना आली. मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि पादचारी पूल यांना जोडणाऱ्या लिफ्ट मध्ये २० प्रवासी अडकले. मात्र पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांनी या सर्व प्रवाशांना प्रसंगावधान राखत सुखरूप बाहेर आणले.
पोलिस कॉन्स्टेबल शाहीन अल्ताफ पठाण यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र मुम्बई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद