रायगड जिल्हा परिषद शाळा आषाणेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप

रायगड जिल्हा परिषद शाळा आषाणेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप 
कर्जत :- बातमीदार दिलीप वाघ
कर्जत दिनांक २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून समांतर प्रतिष्ठान कर्जत तालुका व पूजा स्वीटस् डिकसळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा परिषद शाळा आषाणेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
सकाळी 7 वाजता आषाणेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीनंतर रिटायर्ड रेल्वे कर्मचारी नागो पिरकड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लहान 9 मुलांमुलींच्या गीतगायनाने संपूर्ण शालेय परिसर देशभक्तीमय झाला व घोषणा देण्यात आल्या....त्यानंतर मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
तसेच कार्यक्रम समयी (समांतर प्रतिस्ठान कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश ठाकूर सर) , उपाध्यक्ष कैलास वाघ सर संघटक दिलीप वाघ, सहसचिव अक्षय हिरे शालेय कमिटी अध्यक्ष रमेश सांबरी, उपाध्यक्ष वैशाली पाचांगे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पिरकड, रेल्वे कर्मचारी नागो पिरकड शालेय शिक्षकवृंद निलेश शिनारे सर, राहुल खरतोडे सर अंगणवाडी सेविका सुनिता घोडविंदे, ग्रामस्थ व आजी - माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली..
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन