जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेल संपन्

जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेल संपन्
  प्रसिद्ध आंबेडकरवादी कवी गजलकार यांच्या कविता गजलने जिंकली रसिकांची मने
( प्रतिनिधी आशा रणखांबे ) 
कांदिवली: धम्म परिषद कांदिवली पूर्व, आयोजित तिसरे सत्र सम्यकाच्या कविता मध्ये बौद्ध धम्म परिषदेचे उदघाटन जेष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जेष्ठ गजलकार भागवत बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन स्व.विलासराव देशमुख मैदान,लोखंडवाला कॉप्लेक्स कांदिवली पूर्व येथे संपन्न झाले. प्रसिद्ध कवींच्या कविता/ गजलने कार्यक्रमास रंगत आली या कविसंमेलनात बबन सरोदे,गजानन गावंडे , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे,मास्टर राजरत्न राजगुरू,शाम बैसाने,नरेश जाधव,अण्णा त्रिभुवन,सुनील ओव्हाळ,सुदाम कटारे, वि. टी. जाधव,अशोक मोरे,अनंत धनसेरे ,गौतम सकपाळ,आदी सदावर्ते,प्रा.संध्या वैद्य,अर्चना शंभरकर आदी. कवितांच्या कवितेने उपस्थित रसिकांची मने जिंकली.या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन जेष्ठ विद्रोही कवी बबन सरोदे आणि गजलकार गजाजन गावंडे यांनी केले तर आभार चंद्रकांत पवार यांनी केले. 
बौद्ध धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष विश्वनाथ भोईर, गौतम पवार, डॉ विजय कदम, रमेश गोलाईत ,चंद्रकांत पवार,रवि दांडगे, राजेश मोरे,तुळशीराम कांबळे,यादवराव उघडे,उमेश जधव,नामदेव चव्हाण,सर्जेराव शिरसाट,चंद्रकांत बगाडे इ.बौद्ध धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत