शाळा पुनर्बान्धणी प्रत्यक्ष सुरुवातीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न.
शाळा पुनर्बान्धणी प्रत्यक्ष सुरुवातीसाठी स्वाक्षरी अभियान संपन्न..
शासन कोटयावधि रुपये शिक्षणकर वसुली करीत आहे, गवर्नमेंट एजुकेशन सेस च्या नावाने उल्हासनगर शहराच्या 1 लाख 75 हज़ार सम्पत्तिद्वारे आजपर्यंत करोड़ो रूपये वसुली करुन सुद्धा उल्हासनगर महानगर पालिका शाळांची ही दुरावस्था का..!!??
शाळा पुनर्बान्धणी ची सुरुवात होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल..
दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी शाळा क्रमांक २४ व हिन्दी शाळा क्रमांक १८ पुनर्निर्माण कार्याबद्दल स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले,
प्रा प्रवीण माळवे, दिव्य मुंबई मराठी संपादक शिवाजी म्हस्के, निरिक्षक प्रफुल्ल भालेराव, गजानन लिंबोरे, संतोष खत्रे पत्रकार विकास हनवते, गणेश सोष्टे, बादशाह शेख, विनोद सुरडकर, महेश साबळे, रवींद्र गोपाळे, मिरा सपकाळे व अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हस्ताक्षर अभियान राबवले,
प्रमुख उपस्थित वरिष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,
शासन कोटयवधि रुपये शिक्षणकर वसुली करीत आहे, सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण ही मूलभूत आवश्यकता आहे, गवर्नमेंट एजुकेशन सेस च्या नावाने उल्हासनगर शहराच्या 1 लाख 75 हज़ार सम्पत्तिद्वारे आजपर्यंत करोड़ो रूपये वसुली करुन सुद्धा उल्हासनगर महानगर पालिका शाळांची ही दुरावस्था का..!!?? असा प्रश्न उपस्थित झाला,
शाळा पुनर्बान्धणी प्रत्यक्ष सुरुवातीसाठी स्वाक्षरी अभियान हे राबवले जाणार व उल्हासनगर शहरातील अन्य महानगर पालिका शाळांच्या दुरावस्थेबाबत ही आवश्यक झाल्यास हस्ताक्षर अभियान राबवले जाइल, असे अभियानकर्त्यांनी प्रतिपादन केले.
दरम्यान मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. प्रवीण माळवे, कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर यांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला,
बंडू देशमुख यांचे तर्फे शाळा लवकर सुरु करा, या मागणीचे निवेदन उमनपा आयुक्त व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर याना दिले होते. शाळा पुनर्बांधणी बांधकाम परवाना नगररचनाकार विभागात असून लवकरच शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने दिले गेले आहे, अशी माहिती बंडू देशमुख यानी दिली,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद