तुझी गं स्माईल...' म्हणत आलं सुमधूर प्री-वेडींग साँग

'तुझी गं स्माईल...' म्हणत आलं सुमधूर प्री-वेडींग साँग
काळानुरूप सर्व गोष्टी बदलत जातात तसे लग्नसोहळे आणि त्या निमित्ताने होणाऱ्या इतर समारंभांमध्येही मागील काही वर्षांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती आणि रुढी-परंपरांच्या पाऊलखुणा जपणाऱ्या लग्नसोहळ्यांचं स्वरूप आज खूपच भव्य-दिव्य बनलं आहे. प्री-वेडींग शूटचा ट्रेंड सध्या जोरात आहे. त्यामुळे वधू-वरामध्ये प्री-वेडींग शूटचं प्रमाण वाढलं आहे. लग्नापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढण्यापासून सुरू झालेला हा ट्रेंड आज प्री-वेडींग साँगपर्यंत पोहोचला आहे. आजच्या सिंगल्सच्या काळात रिलीज करण्यात आलेलं 'तुझी गं स्माईल...' हे नवं कोरं सुमधूर गीत सिंगल नसून एक प्री-वेडींग साँग आहे. 
फायरफ्लायची प्रस्तुती असलेलं 'तुझी गं स्माईल...' हे गाणं  अलिबागमधील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलं आहे. या निमित्तानं संगीतप्रेमींना नेत्रसुखद लोकेशन्ससोबतच समुधूर गीत-संगीताचा आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे. श्वेता बसनाक पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्याची निर्मिती सत्यवान पाटील आणि फायरफ्लाय यांनी मिळून केली आहे. श्वेता बसनाक पाटील यांनीच 'तुझी गं स्माईल...' हे गाणं लिहिलं असून, संकलनाची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. पहिल्यांदाच सुमधूर संगीत दिलंय संगीतकार आकाश बसनाक यांनी गायक मितेश चिंदरकर यांच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'तुझी गं स्माईल...' या गाण्याच्या माध्यमातून संगीतप्रेमींसमोर मेलोडीचा अद्भुत नजराणा सादर करण्यात आला आहे. शब्द आणि संगीताची जणू जुगलबंदीच या गाण्याच्या निमित्ताने जुळून आल्याचं अनुभवायला मिळत आहे. श्वेता बसनाक पाटील आणि आकाश बसनाक यांचा 'तुझी गं स्माईल...'सारखी प्री-वेडींग साँग शूट करण्यात हातखंडा आहे. यांची गाणी तरुणाईमध्ये चांगलीच पॅाप्युलर होत असून, वधू-वरासाठी आयुष्यभारासाठी आठवणींची एक रेशमी ठेव देणारी ठरत आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या प्री-वेडींग साँगला प्रचंड मागणी असून, श्वेता आणि आकाश यांच्या कौशल्याचं सर्वच स्तरांमधून कौतुक होत आहे.
लाईव्ह ऑन म्युझिक या युट्यूब चॅनेलवर 'तुझी गं स्माईल...' हे प्री-वेडींग साँग प्रसारीत करण्यात आलं आहे. यावर प्री-वेडींग साँग बनवण्यास इच्छुक असणाऱ्यांना संपर्कही साधता येऊ शकेल. डिओपी संदेश पेडणेकर यांनी या गाण्याची सिनेमॅटोग्राफी केली असून, अभिजीत पाडावे यांनी सहदिग्दर्शन केलं आहे. अजय घारपुरकर आणि निल पाटील हे या गाण्याचे कार्यकारी निर्माते आहेत. अभिजीत पाडावे यांनी या गाण्याच्या पब्लिसिटी डिझाईनची जबाबदारी अतिशय उत्तमरीत्या सांभाळली आहे. अशी माहिती पि आर ओ सचिन शिंदे यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार