कंजारभाट समाज सामाजिक संस्था यांच्या उपोषणाला मिळाले यश लवकरच जातीचे दाखले देण्यात येतील असे तहसील कार्यालय कडून मिळाले लेखी पत्र

कंजारभाट समाज सामाजिक संस्था यांच्या उपोषणाला मिळाले यश लवकरच जातीचे दाखले देण्यात येतील असे  तहसील कार्यालय कडून मिळाले लेखी पत्र

अंबरनाथ : कंजारभाट समाजातील बांधवांना जातीचे दाखले मिळावे या करिता कंजारभाट समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद तामचेकर यांनी अंबरनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी दिनांक 13 मार्च 2023 रोजी उपोषण केले होते कंजारभाट समाजातील 117 लोकांच्या दाखल्यांचे अर्ज अंबरनाथ तहसील कार्यालय या ठिकाणी दाखल करण्यात आले असतानाही जातीचे दाखले मिळत नसल्याने 13 मार्च रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी उपोषण सुरू केले असता
अंबरनाथ तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी यांनी कंजारभाट समाज सामाजिक संस्थेला उपोषण मागे घेण्याकरिता परिपत्रक देऊन लवकरच  जातीचे दाखले  देण्यात येतील असे लेखी पत्र देऊन आश्वासन दिले व उपोषण मागे घेण्या साठी पत्र दिले असता कंजारभाट समाज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालय यांच्या मार्फत मिळालेल्या पत्राचा आदरपूर्वक स्वीकार करून उपोषण मागे घेतले 
अशी माहिती कंजार भाट समाज सामाजिक संस्था चे अध्यक्ष विनोद तामचेकर यांनी दिली
 या वेळी सल्लागार शेखर अभंगे, केवल अभंगे, गणेश तमायचिकर, सागर गागडे, भिमराव इंगोले, सुंदर डांगे, विशाल गारुंगे, धनराज डांगे, पप्पू अभंगे, गणेश नेतले, हेलन तमायाचिकर, दिपा तामचेकर, शारदा अभंगे, अतिश इंद्रेकर,निरज माछरे, प्रिती प्रधान हे उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार