कुणी गोविंद घ्या...?' नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज

'कुणी गोविंद घ्या...?' नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज...
आपण नात्यांत एकमेकांना गृहीत धरतो. स्वतःच वेगवेगळ्या कल्पना करून घेतो. पण एकमेकांशी बोलण्याने; तसेच आपण आपले मत शांतपणे मांडले तर समस्या नक्कीच सुटतात, असा विचार मांडणारे 'कुणी गोविंद घ्या...?' हे नवीन नाटक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. सध्या या नाटकाच्या तालमी जोरात रंगल्या आहेत. शुक्रवार, १७ मार्च रोजी गडकरी रंगायतन, ठाणे या नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. 

या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन दीपेश सावंत यांनी केले आहे. प्रसाद रावराणे, सिद्धेश नलावडे आणि विभूती सावंत अशी तरुण कलाकारांची फळी या नाटकात भूमिका साकारत आहे. यशवंत क्रिएशन आणि अर्चना थिएटर्स यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. रॉबिन लोपेज व राम सगरे यांचे नेपथ्य, संकेत शेटगे यांचे संगीत व शिवाजी शिंदे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. उदयराज तांगडी हे निर्मिती प्रमुख आहेत. नाटकाचे निर्माते म्हणून मोनाली तांगडी, शेखर दाते व दुर्वा सावंत हे जबाबदारी सांभाळत आहेत.  
प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार