*प्रशांत दामले यांचे ‘नियम व अटी लागू’
प्रशांत दामले यांचे ‘नियम व अटी लागू’
माणूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. थोडक्यात काय तर नियम व अटींच्या बाबतीत विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो. सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय?
नियम अटींची ही कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायची असेल तर निर्माते प्रशांत दामले यांनी भन्नाट नियम व मजेशीर अटींसह रंगभूमीवर आणलेलं ‘नियम व अटी लागू’ हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक चुकवू नका. गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नव्या नाटकाचा शुभारंभ शनिवार १८ मार्च सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली रात्रौ ८.३० वा. होणार आहे.
नाटकातील नियम व अटींच्या बाबतीत सदैव जागरूक असणारे निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या खुमासदार लेखणीने नियम व अटींचा लेखाजोगा मांडणारे युवा लेखक संकर्षण कऱ्हाडे या त्रयीचं हे नाटक आहे. स्वत: संकर्षण कऱ्हाडे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद