सौ.सुवर्णा साळुंके यांच्या प्रयत्नांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना मिळाले रुपये.10,000/-अनुदान
अंबरनाथ: प्रतिनिधी
संवाद फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा सुभाष साळुंके यांनी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या सहकार्याने अंबरनाथमधील श्रीकृष्ण नगर, महालक्ष्मी नगर, शिवाजी नगर, ताडवाडी परिसर येथे राहणाऱ्या व अनेक वर्ष घरकाम करणाऱ्या महिलांची महाराष्ट्र घरेलु कामगार मंडळ, कल्याण येथे सन 2014 पासून नियमित नोंदणी करुन घेतली, शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ घरकाम करणाऱ्या 250 हून अधिक महिलांना मिळवून देण्याचे काम साळुंके दांपत्यांनी निस्वार्थी पणे केलेले आहे.
घरकाम करणाऱ्या महिलांची कौटुंबिक परिस्थती आर्थिक बेताची असते, अश्या कष्टाळू वंचित घटकांना एकत्र करून त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना थेट लाभार्थी पर्यंत पोहाचिण्याचे काम संवाद फाउंडेशन च्या वतीने निःशुल्क पध्दतीने केले जाते,
महाराष्ट्र घरेलु कामगार मंडळ कल्याण येथील कार्यालयात नियमित शासकीय म्हणून नोंदणी केलेल्या व कार्ड नूतनीकरण केलेल्या महिलांना,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे साहेब यांनी धाडसी निर्णय घेऊन वय वर्षे ५५ ते ६० या वयोगटातील घरेलु कामगार महिलांना ₹१०,०००/- मानधन देण्याचे जाहीर केले या मानधन निधीचा लाभ आपल्या विभागातील व शहरातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मिळवून देण्यासाठी सौ. सुवर्णा सुभाष साळुंके यांनी विशेष प्रयत्न केले, त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात थेट ₹१०,०००/- मानधन निधी जमा झाला, खाऱ्या अर्थाने केवळ निवडणूक म्हणून काम न करता सर्वसामान्य जनतेचे सेवक म्हणुनच सौ. सुवर्णा साळुंके व सुभाष साळुंके ये काम करतात, याचा परिसरातील नागरिकांना आधार वाटतो.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळ येथे नवीन नोंदणी केलेल्या २५ घरकाम करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले व ज्यां घरेलु कामगार महिलांना १००००/- रुपये मानधन मिळाले त्या महिलांचाही सत्कार करण्यात आला, काही लाभार्थी महिलांनी संवाद जनसंपर्क कार्यालय येथे सौ.सुवर्णा साळुंके यांचे पेढे भरवून आभार व्यक्त केले.महिलांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आल्याचे सांगून सौ.सुवर्णा साळुंके यांनी महाराष्ट्र राज्याचे सवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जाहीर आभार व्यक्त केले तसेच योग्य मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंके व कामगार सहआयुक्त सौ.सारिका राऊत यांचे धन्यवाद मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद