बार्टी फेलोशिपचा लढा यशस्वीजिगरबाज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

बार्टी फेलोशिपचा लढा यशस्वी
जिगरबाज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश   
अनुसुचित जातीच्या सर्व ८६१ पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट मिळणार फेलोशिप:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून मागणी मान्य:भीमराव चिलगावकर,    मुंबई :( प्रतीनिधी ) बार्टीच्या अनुसूचित जातीमधील ८६१ पीचडी संशोधकाचा लढा नुकताच सरसकट फेलोशीप खेचून आणत तब्बल ५३दिवसांनी संपला.मात्र आझाद मैदानात टाहो विरून जाणारा त्यांचा लढा मिडीयांतून लोकांपर्यंत पोहचायला ४३ दिवस लागले.मग त्यानंतर अवघ्या १० दिवसांतच पीएचडी संशोधकांना न्याय मिळाला 
दैनिक सामना,पुढारी,लोकमत,
महाराष्ट्र टाईम्स,सकाळ,व्रूत्तमानस,पुण्यनगरी,
साप्तहीक बातमी जनहित, तसेच आदी व्रूत्तपत्रांनी आणि जनहित न्युज महाराष्ट्र सारख्या यूट्यूब चैनेलनी  संशोधकांवरील अन्याय अगदी खेडोपाडी पोहोचवला.संविधान समर्थक दलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ,प्राचार्य रमेश जाधव,प्रा.एकनाथ जाधव,बहुजन संग्रामचे अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक,भीमराव चिलगावकर यांनी संघटना व मिडीयाच्या माध्यमातून बार्टी पीएचडी संशोधक जिगरबाज विद्यार्थ्यांच्या  आंदोलनाला यश मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतूक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अशी माहिती भिमराव चीलगावकर यांनी दिली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन