प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड आणि सी एस आर संमेलनाचे आयोजन दिल्लीमध्ये होणार

प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड आणि सी एस आर संमेलनाचे आयोजन दिल्लीमध्ये होणार
दिल्ली : 30 एप्रिल 2023 रोजी दिल्ली मध्ये राष्ट्रीय स्तराची सीएसआर सेमिनार आणि प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2022 चे आयोजन करण्यात येत असून यामध्ये भारत देशातील अनेक राज्यातून 400 पेक्षा अधिक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षा संस्था, शाळा कॉलेज,स्वास्थ संघटना, आणि सामाजिक विकास कार्यात असलेले अनेक नागरिक सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात सी एस आर चे माध्यमातून जमिनी स्तरावर कार्य करीत असलेल्या एनजीओ आणि सामाजिक कार्यामध्ये मदत कार्य करीत असलेल्या कंपन्यांचे अधिकारी आणि सामाजिक विकास कार्यात असलेले विभिन्न प्रभावशाली नागरिक भाग घेऊन कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहेत आणि सामाजिक क्षेत्र या विषयी चर्चा करणार आहेत
प्योर सोशल इम्पॅक्ट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे संस्थांना सन्मानित करण्यासाठी एक मंच आहे जो आपल्या क्षेत्रात सुधारणा करण्याकरिता प्रयत्नशील आहे.आणि इतरांना सुद्धा प्रेरणा व प्रोत्साहन देत आहे 

या पुरस्कार कार्यक्रमातून समाजात होत असलेले बदलाव आणि सफलता या कार्याला लोकांसमोर आणण्याकरिता महत्त्वपूर्ण प्रयत्न केला जात आहे

ज्याच्या माध्यमातून जमिनी स्तरावर कार्य करीत असलेल्या 30 संस्थांना आणि नागरिकांना समाजासमोर आणून त्यांची ओळख निर्माण करून देणे आहे
या पुरस्कार कार्यक्रमात 5 लाख रुपयांची पुरस्कार राशी प्योर इंडिया ट्रस्टच्या द्वारे प्रशिक्षित आणि निवडलेल्या 10 पार्टनर एनजीओला मिळणार आहे त्याचे पूर्णपणे सामाजिक कार्यासाठी उपयोग केला जाईल या दहा एनजीओ ची निवड 157 प्रतिभागी च्या मधून वेगवेगळ्या स्तरावर आलेल्या प्रतिस्पर्ध्यामधून निवड केली आहे यापैकी 5 एनजीओ यांना सेमिनार मध्ये थोडक्यात बोलण्याची संधी दिली जाईल व त्याच आधारावर पुरस्कार राशी आणि विजेता यांच्या नावाची निवड होईल 

या कार्यक्रमात सामाजिक कार्यामध्ये मदत करीत असलेल्या सी एस आर कंपनीचे अधिकारी यांच्याशी भेटीगाठी करण्याची व प्रश्न उत्तर करण्याची संधी मिळेल

तसेच या वर्कशॉप मध्ये देश विदेशातून फंड एकत्र करणे सी एस आर चे नवीन नियम याची माहिती आणि दानदाते यांच्याशी भेट करण्याची संधी मिळेलप्योर इंडिया ट्रस्ट मागील 1 वर्षापासून जमिनी स्तरावर कार्य करीत आहे तसेच एनजीओ साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सेमिनार द्वारे प्रशिक्षण कार्यक्रम राबवीत आहे प्योर इंडिया ट्रस्ट या यूट्यूब चैनल वर एनजीओ क्षेत्रातील संपूर्ण माहिती निशुल्क देण्यात आली आहे तसेच एक सफल एनजीओ कशी चालविता येईल याची संपूर्ण माहिती सुद्धा दिली आहे
अशी माहिती सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संस्थापक राजकुमार शर्मा यांनी दिली असून उल्हासनगर महाराष्ट्र जिल्हा ठाणे या ठिकाणी कार्य करीत असलेली सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ ची निवड झाली असल्याची माहिती सुद्धा राजकुमार शर्मा यांनी दिली आहे सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ ची निवड या स्पर्धेमध्ये झाल्या बद्दल संस्थापक राजकुमार शर्मा यांचे उल्हासनगर शहरात कौतुक होत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार