मा.नगरसेवक श्री. सुभाष साळुंके व सौ सुवर्णा साळुंके यांच्या भक्ती - शक्ती प्रतिष्ठान च्या वतीने

मा.नगरसेवक श्री. सुभाष साळुंके व सौ सुवर्णा साळुंके यांच्या भक्ती - शक्ती प्रतिष्ठान च्या वतीने
अंबरनाथ प्रतिनिधी          
 महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या खुली ऑनलाईन निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ भक्ती शक्ती चौक, वडवली विभाग, अंबरनाथ पुर्व  येथे माजी नगराध्यक्ष श्री सुनिल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यां सोबत पालकही उपस्थित होते, 
120 मुलांनी online निबंध स्पर्धेत सहभाग घेतला,
कु, सिद्धी  सावंत,समीक्षा शिंदे ,आर्यन सावंत ,कुशल पार्टे,शिवम मुंडे , तनिष्का उतेकर,सार्थक देवळेकर, आमन सिंह, प्रतिक जाधव ,सरिका सोलंकी , निररालीदेवी यादव ,पायल गुप्ता इ.उपस्थित14  विजेत्यांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले.
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 
विद्यार्थ्यांनी आयोजक श्री. सुभाष साळुंके व सौ. सुवर्णा साळुंके यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
मुलांमध्ये वाचन, लिखाण, व वकृत्व याची आवड निर्माण व्हावी तसेच आपले संत,महापुरुष,सामजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची माहिती मिळविणे, संकलीत करणे व सांगणे हया करिता निवंध स्पर्धेचे आयोजन सुभाष साळुंके,सौ. सुवर्णा साळुंके यांनी केल्याने मुलांना संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल सुनिल चौधरी यांनी आयोजकांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  सुमित बनसोडे, अजिंक्य गिरी, राजकुमार जमखंडीकर,चंद्रकांत फालके, समीर दुधाणे व भाऊ केंगरे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार