उल्हासनगर मधील श्रीस्वामी शांती प्रकाश ( प्रभात गार्डन ) उद्यानाची दूरअवस्था.
उल्हासनगर : कॅम्प नंबर 5 उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग समिती 4 मधील श्रीस्वामी शांती प्रकाश उद्यान म्हणजेच (प्रभात गार्डन ) या उद्यानाची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 आणि 5 मध्ये हेच सर्वात मोठं जुने उद्यान आहे.या उद्यानात मोठया प्रमाणात लहान मुले खेळण्यासाठी व जेष्ठनागरिक व्यायामासाठी येत असतात.सकाळी उल्हासनगर 4/5 मधील जेष्ठ नागरिक मोठया प्रमाणात वॉकसाठी येतात.परंतु ठेकेदाराने या उद्यानातील व्यायमाच साहित्य काढून ठेवले आहे व मोठया प्रमाणात मातीचे ढिगारे करून ठेवले आहेत. उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या जाळ्या चोरीला गेल्या आहेत उद्यानातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेल आढळून आले आहे .या उद्यानाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी या पूर्वी सुद्धा करोडो रुपये खर्च करण्यात आलेले आहेत.व आत्ता म्हणजे 05/10/2021 ला या उद्यानाच्या दुरुस्तीसाठी 99,85100 रुपयाची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. व ठेकेदाराला 9 महिन्यात हे काम पूर्ण करायचे होते परंतु ही वर्क ऑर्डर निघून 18 महिने उलटले आहेत तरी सुद्धा उद्यानाची अवस्था जैसे थे तशीच आहे. मनपाच्या नियमानुसार ठेकेदारावर प्रशासनाने कारवाई कारणे अपेक्षित होते परंतु 'तेरी भी चुप मेरी भी चुप अशी अवस्था सध्या महापालिका प्रशासनाची झाली असल्याचे मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी माहिती दिली आहे, तसेच तात्काळ हे काम सुरु केल नाही तर मनसे शहर अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती ही दिली आहे .मनसेच्या वतीने 6 मे रोजी या उद्यानाची पाहणी करण्यात आली, त्यावेळेस या उद्यानाची बिकट अवस्था मनसेचे बंडू देशमुख यांच्या निदर्शनास आली, काही दिवसातच पाऊस सुरु झाल्यास या उद्यानात चिखल होऊन लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना चालणे मुश्किल होणार आहे त्यामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही , याकरिता संबंधित अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून या उद्यानाची दुरावस्था दूर करावी अशी मागणी केली आहे यावेळी शहर अध्यक्ष बंडू देशमुख, उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव,विभाग अध्यक्ष सागर चौहान, सुहास बनसोडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हरी आल्हाट जनहित न्यूज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद