दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या;
दोन हजारांच्या नोटा वितरणातून काढल्या
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (१९ मे) मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने दोन हजार रुपयांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या आहेत. या नोटा अद्याप अवैध ठरवल्या नाहीत. नागरिकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. नागरिकांना एकावेळी दोन हजार रुपयांच्या केवळ १० नोटा (२० हजार रुपये) जमा करता येणार आहेत. “बाजारात इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असं कारण देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेनं घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. आरबीआयच्या निर्णयाबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले, “आरबीआयने निर्णय घेतला असेल तर तो काही विचाराअंतीच घेतला असेल.” प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद