पाणी मिळत नसल्याने रस्ता रोको आंदोलन

पाणी मिळत नसल्याने रस्ता रोको आंदोलन. उल्हासनगर शहरात गणेश नगर 39 सेक्शन कँम्प 5 या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून पिण्याचे पाणी सोडण्यात आले नाही म्हणून लहुजी सेना व मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने 15 मे 2023 रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते आंदोलकांनी रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांची अडवणूक करून रहदारीस अडथळा निर्माण केला होता, या आंदोलनाची माहिती मिळताच हिल लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले व आंदोलकांशी चर्चा करून राहदरीचा रस्ता मोकळा केला, तसेच पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी यांनी आंदोलन करते यांच्याशी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व पाणी पुरवठा कडून नागरिकांना पाणी न मिळण्याच्या समस्या त्यांना सांगितल्या तसेच तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा करतो अशी माहिती दिली यावेळी आंदोलकांनी पाणीपुरवठा विभागाची चर्चा करून आंदोलन मागे घेतले,
 केशर भाऊ लोणारे,
 यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते यावेळी परिसरातील अनेक महिला व नागरीक सहभागी झाले होते,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा