एमआईडीसी तर्फे आपटी बंधारा वर उपाययोजना सुरु.. आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा ग्रामस्थाना थोड़ाफार दिलासा.
आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा ग्रामस्थाना थोड़ाफार दिलासा..
कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी या शेतीप्रधान गावातील ग्रामस्थ व तरुणांना रस्त्याच्या अभावामुळे अत्यंत जीवघेणा व अंगावर शहारे आणणारा प्रवास करावा लागत होता,
उल्हास नदीच्या काठावर आपटी हे गाव वसलेले आहे. पुर्वीच्या काळात शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय होता. परंतु अंबरनाथ, बदलापूर येथे एमआयडीसी झाल्याने आजूबाजूच्या आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा आदी गावातील तरुण येथे कामधंद्यानिमित्ताने उल्हास नदीतून जात येत होते, येथे उल्हास व बारवी नदीचा संगम होत असल्याने जांभूळ एमआयडीसी ने येथे पाणसाठवण बंधारा बांधला होता.
वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसी ने या आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मिटर रुंंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट बनवून दिली होती. येथूनच गावकऱ्यांची ये जा सुरू होती. परंतु मागील एक दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे या पायवाटेचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या लोकांचा रस्ता बंद झाला होता. आपटी गावातील ५०/६० तरुण या मार्गाने एमआयडीसी येथे पोटाची खळगी भरण्यासाठी ये जा करीत होते त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली. दुसरीकडून जायचं असेल तर २०/२५ किमी अंतर जावं लागत असे. यामुळे पैसा व वेळ दोन्ही खर्ची पडत होते. कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे अगोदरच अनेकांचे रोजगार गेले होते. ज्यांचे होते ते रस्त्याच्या अडचणी मुळे जाणार होते. त्यामुळे ते जाऊ नये म्हणून हे तरुण, महिला, मुले आणि वयोवृद्ध व्यक्ति अंत्यत जीवघेणा बाईक व पायी प्रवास करतात, थोडाजरी तोल गेला तर सरळ उल्हास नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याची भिती असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद