माजी नगरसेवक . सुभाष साळुंके यांनी वाढ दिवासानिमित्त खासदार मा. डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते अद्यावत "संवाद रुग्णवाहिका"चे लोकार्पण केलें
माजी नगरसेवक . सुभाष साळुंके यांनी
वाढ दिवासानिमित्त खासदार मा. डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते अद्यावत "संवाद रुग्णवाहिका"
अंबरनाथ: कोरोना महामारीच्या दुसऱ्या जीवघेण्या लाटेत अनेकांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण/जीव गमवावे लागत होते,यावेळी निदान घराच्या घरी किंवा पोस्ट कोव्हिड रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा याकरिता माजी नगरसेवक –सुभाष साळुंके, यांनी 8 मे 2020 च्या वाढदिवशी 3 ऑक्सिजन concentrator machince लोकसेवेत रुजू केले होते, आतापर्यंत 48 जणाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. अंबरनाथमधील नागरीकांना आवश्यक व जनउपयोगी सुविधा देणे च्या दृष्टीने सुभाष साळुंके प्रयत्नशील असतात,त्याच भावनेतून गरजू रुग्णांना व नागरीकांना अत्यावश्याक वेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून वेळेवर हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार होणेकरिता रुग्णवाहिकेची आवश्यकता होती, त्यासाठी संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या मागणी नुसार गेले 2 वर्षा पासून प्रयत्न सुरू होते,
दि.8 मे 23 रोजी सुभाष साळुंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मारुती सुझुकी कंपनीची इको ॲम्बुलन्स "अद्यावत रुग्णवाहिका" कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या शुभ हस्ते अंबरनाथ पुर्व येथे लोकार्पित केले.
यावेळी सुभाष साळुंके यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन करून वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून सहकाऱ्यांच्या मदतीने एकहाती संवाद रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. अश्या प्रकारे आदर्श इतरांनी ठेऊन जनसेवा केली पाहिजे, नागरिकांच्या अडीअडचणी वेळी मदत केली पाहिजे,असे सांगून सुभाष साळुंके हे सर्वसमावेशक काम करणारा लोकप्रतिनिधी आहे, याचा अभिमान वाटतो आहे,असे उदगार काढले.
यावेळी जिल्हा प्रमुख . गोपाळ लांडगे, स्थानिक आमदार डॉ बालाजी किणीकर,उल्हासनगर चे भाजप आमदार . कुमार आयलानी, माहिम विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार . सदा सरवणकर, उपजिल्हा प्रमुख . अरुण आशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी,उल्हासनगर भाजप जिल्हा अध्यक्ष जमनु पुरस्वानी, शिवसेना मुंबई विभाग क्र.10 महिला विभाग प्रमुख सौ. प्रिया गुरव, माजी नगराध्यक्षा सौ. प्रज्ञा बनसोडे, मा.नगरसेवक रविंद्र पाटील, मुक्कु लेनिन, युवासेना तालुका प्रमुख शैलेश भोईर, शिवसेना पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद