अक्षय भालेराव यांची हत्या करणा-या आरोपींना शिक्षा द्या - वंचित बहुजन आघाडी

अक्षय भालेराव यांची हत्या करणा-या आरोपींना शिक्षा द्या - वंचित बहुजन आघाडी
उल्हासनगर - नांदेड जिल्हयातील बोंढार हवेली गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पदाधिकारी अक्षय भालेराव यांची हत्या करणा-या आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी शहराचे प्रांत अधिकारी यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी 
उल्हासनगर शहराचे प्रांत अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नांदेड जिल्हयातील भोंडार हवेली गावातील वंचित बहुजन आघाडी पक्षातील पदाधिकारी अक्षय भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भीम जयंती साजरी करून गावातून मिरवणुक काढली म्हणुन गावातील गाव गुंडांनी जातीयतेच्या दृष्टीकोनातून मनात चीड निर्माण होऊन अक्षय भालेराव यांची निघृण हत्या केली तरी या हत्येतील सर्वच्या सर्व आरोपींना जातीवादी गावगुंडांना न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी यासाठी आम्ही मागणी करीत आहोत. तरी आपण आमचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर कराल अशी अपेक्षा बाळगतो व वरील घटनेचा आणि वारंवार बहुजन समाजातील व्यक्तीवर, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे.या सर्व घटनेचा व सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो असेवंचित बहुजन आघाडीचे उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे यांनी  उल्हासनगरचे प्रांत अधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. यावेळी पक्षाचे नेते सारंग थोरात, शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे, महिला अध्यक्षा रेखाताई उबाळे, संगिता ताई नेतकर, रमेश गायकवाड, दिवाकर खळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन