नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ
मुंबई: अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ ही धर्मादाय आयुक्त मुंबई ह्यांच्याकडे नोंदणीकृत संस्था असून, संस्थेने त्यांच्या ध्येय धोरणानुसार नाट्य-सिने-मालिका- जाहीरात या क्षेत्रात होतकरू कलाकारांसाठी व्यासपीठ निर्माण करीत आहे. जेणेकरून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल. व त्या अनुषंगाने भविष्यात त्यांना संधीही उपलब्ध होऊ शकेल.* ह्या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर विनामूल्य एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर शनिवार दिनांक १० जून २३ रोजी संध्या.५ ते ८ या कालावधीत किते भंडारी सभागृह, गोखले रोड, छ. शिवाजी पार्क, सेनाभवनच्या मागे दादर मुंबई यथे आयोजित केले आहे. ह्या मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन अभिनेता विजय पाटकर, प्रमुख अतिथी लेखक-दिग्दर्शक-कलाकार गंगाराम गवाणकर, प्रमुख उपस्थितांमध्ये लेखक-साहित्यिक- नाटककार प्रा.डॉ. प्रदीप ढवळ, निर्माता-लेखक-दिग्दर्शक संदीप वाईरकर, गायक सुधीर मांजरेकर, लेखक-दिग्दर्शक आबा पेडणेकर व नंदा आचरेकर, संगीतकार गजेंद्र मांजरेकर, लेखिका-अभिनेत्री, विजया कुडाव व विद्याताई मंत्री, नेपथ्यकार सुधाकर मांजरेकर इत्यादींचे मार्गदर्शन लाभणार आहे. अशी माहिती महासंघाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख गणेश तळेकर ह्यांनी दिली. महासंघाचे अध्यक्ष. नविनचंद्र बांदिवडेकर ह्यांनी शनिवार दि. ३ जून २३ रोजी रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे " भाव प्रेमाचे " या music अल्बम च्या पोस्टर चे लॉंच करण्यात आले, या वेळी मुलगा मयूर भाटकर व ऐश्वर्या बदाडे उपस्थित होते,व बाल कलाकारांनी सादर केलेल्या अर्चना थिएटर - निर्माते शेखर दाते ,लेखक - दिग्दर्शक रमेश वारंग व के. राघवकुमार याच्या छोटा भीम , डोरेमन , जंगलातील धमाल या नाटिकांच्या प्रयोगादरम्यान हौशी कलावंतांनी महासंघाच्या कार्यशाळेत प्रवेश करून *उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याची तयारी महासंघाने दाखविली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद