"२३ वर्षांनी सर्वजन एकत्र भेटणार!"वसंतराव(दादा ) पाटील विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज मांजर्डे

"२३ वर्षांनी सर्वजन  एकत्र भेटणार!"
वसंतराव(दादा ) पाटील विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज मांजर्डे

( विचारवंत साहित्यिक ॲड. नवनाथ आनंदा रणखांबे )    
व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून  आपण एकत्र आलो आज गेट टूगेदर आपल्या हायस्कूलमध्ये आहे. आयुष्यातला हा  एक आनंदाचा पर्व आहे. हायस्कूल जीवनाचे आनंदाचे क्षण ताजे झाले. सर्व मित्रांच्या गोड आठवणी हृदयाच्या कप्प्यात खोल खोल रुजल्या आहेत. विकास आणि युवराज दोन वर्षांपुर्वी  आपले गेट टुगेदर व्हावे  असे मला माझ्याघरी माझी भेट घेण्यासाठी आल्यावर बोलत होते. तो दिवस आज प्रत्येक्षात  उजाडला !   
       बंधू सुभाष, नागेश,  विकी, अजित, संदीप, युवराज, शामराव,  विकास, विजय, अशोक, विवेक, उमेश , विक्रम , नवनाथ , नितीन, अवधूत,पिनू, वैभव, बंडू ,  इ .  आपल्या सर्वांच्या  आठवी मी कधी काढत नाही कारण मी कधीच तुम्हा सर्वांना विसरलो नाही. आपण मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी सदैव  ऋणी आहे ! 
  भूतकाळ मी कधीच विसरलो नाही कारण 
जो भूतकाळ विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.आपल्या सर्वांच्या सहवासात घालवलेले चंदेरी सृष्टीचे दिवस मी , आयुष्याच्या डायरीत  सोबत घेऊन फिरतो. 
       माने सर इतिहास शिकवत असताना इतिहासाच्या पानात लपलेला @जहांगीर  हा विकी  जाधव आणि मला;  आम्हाला मध्येच भेटला. विकी मला प्रेमाने  जहांगीर म्हणायचा इतिहासात जहांगीर राजा होता. तो कवी लेखक होता. त्याने त्याच्या प्रेयसी /पत्नी वर पुस्तक लिहिलं होतं.  विकीला माझ्याकडून अपेक्षा होती. मी ही पुस्तक लिहावे. मी हायस्कुलमध्ये  कविता/  लेख/ साहित्य  लिहित होतो हा हायस्कुल जीवनातला सिक्रेट कप्पा होता. ते दिवस माझ्या आयुष्यातील मोरपंखी सोनेरी दिवस......

The school VPVM
हायस्कूल जीवनात मी साहित्यात रमत होतो  
मी लिहित घडत होतो
माणसं वाचत होतो
माणसं ओळखता ओळखता फसत होतो 
मनोमन हसत होतो
हसता हसता रडत होतो
पडत होतो घडत होतो
हायस्कुलचे  दिवस असेच  घालवत होतो ! 

जाण्यासाठी येणे होते 
हे ही दिवस जाणारे होते 
हे कधीच मला कळलं नव्हते  ??? 
विरहाचा बोचरा वारा छळत आहे
हृदयाला क्षणोक्षणी जाळत आहे
वसंत हा रुसला आहे 
वैशाखाने गिळला आहे  ! 
             माझ्या प्रिय  मित्र विकी जाधव  आज माझी 2 पुस्तके प्रकाशित आहेत. पहिल्या पुस्तकाने मराठी साहित्य विश्वात एक नवे  रेकॉर्ड तयार केले आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार मिळवत  ऐतिहासिक विविध आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय  बुक ऑफ रेकॉर्ड केले आहेत . दुसरे पुस्तक त्या मार्गावर आहे. अजून अनेक पुस्तके येणार आहेत.   माझे  सर्व यश कृतज्ञाता पूर्वक मित्रांना , शिक्षकांना आणि अजय VPVM शाळेला !  प्रिय मित्र  विवेक 9th nathas म्हणून प्रेमाने  मला बोलावायचास असे  खूप प्रेम मिळाले. खूप  छान किस्से  मनपटलावर तरंगत आहेत.

     हायस्कूल जीवनात लाभलेले शिक्षक माने सर , भगत सर ,  शिंगाडे सर , मुगदुम सर , चौगुले सर, सपकाळ सर , पाटील सर, इ. च्या मुळे मी घडलो. त्या सर्वांचा मी ऋणी आहे . माणसाचे आयुष्य हे क्षण भुंगुर आहे.  वय ४० वर्षे    पार केल्यावर आयुष्याचा भरवसा नसतो. सर्वांनी स्वतःची ,परिवाराची,  काळजी घ्या.   इतरांचे आयुष्य घडले. ते मोठ्या पदावर गेले मला काहीच करता नाही आले अशी भावना मनात बाळगू नका. हवे ते कधी कधी मिळत नाही .आयुष्यात सर्व गोष्टी  सर्वांना मिळत नाहीत. आयुष्यात काही होता नाही आले तरी काही हरकत नाही.  यारहो  एक चांगला माणूस म्हणून जगता येणे महत्त्वाचे आहे. चांगला माणूस म्हणून जगणे हे आपल्या हातात आहे.  दुसऱ्यांना आनंद देत जाऊया. एकमेकांची सुख -  दुःख  वाटून घेऊया . ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्वजन संपर्कात राहूया.
 आपला @जीवन संघर्षकार नवनाथजी रणखांबे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार