मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा.

*मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा...!*
      
 उल्हासनगर: दिनांक २६ जुलै २०२३ रोजी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, ठाणे* यांच्या कडून अतिवृष्टीची इशारा लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना *दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली होती. परंतु आज दिनांक २७ जुलै २०२३* रोजी काही पालकांच्या *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या* कार्यालयात तक्रारी आल्या की सुट्टी जाहीर असताना देखील *विकास मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या समोर* हि शाळा चालू आहे. काही क्षणातच *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष  वैभव माधव कुलकर्णी, शहर संघटक अशोक गरड, शहर सचिव स्वप्नील त्रिभुवन आणि अजय बागुल* ह्यांनी शाळेवर धडक दिली. सुट्टी जाहीर असताना सुद्धा शाळा चालू आहे ह्या बद्दल *मुख्याध्यापक व शिक्षण अधिकारी साहेब ह्यांच्याशी दूरध्वनी वर चर्चा करण्यात आली. लागलीच शिक्षण अधिकारी साहेबांनी शाळा बंद करून सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मुख्यध्यापक यांना दिले. अशी माहिती 
शहर अध्यक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे वैभव माधव कुलकर्णी यांनी दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप