उल्हासनगर मध्ये लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम

उल्हासनगर मध्ये लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम,
पुर्व आमदार पप्पु कालानी व उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयचे मुख्य शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांचे समर्थन
उल्हासनगर: मिशन जय भारत अंतर्गत 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिना पासून सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लोक कल्याणासाठी सह्यांची मोहीम मध्यवर्ती रुग्णालय गेटच्या बाहेर गेल्या 4 दिवसांपासुन राबवण्यात येत आहे.
उल्हासनगर 3 येथील सेंट्रल हॉस्पिटल सुधारलाच पाहिजे, मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, कुपोषित बालकांसाठी विशेष केंद्र झालं पाहिजे, अपंगांसाठी विशेष केंद्र झालंच पाहिजे, मनोरुग्णांसाठी विशेष केंद्र झालंच पाहिजे, नर्सिंग कॉलेज झालं पाहिजे, या सगळ्या मागण्या घेऊन आज सह्यांच्या मोहीमचा चौथा दिवस आहे.
बौध्द विहार संघटना समन्वय समिती व इंडियन सोशल मुव्हमेंट च्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्यव्यवस्था सुधारणांच्या आंदोलनाच्या ठिकाणी आज चौथ्या दिवशी पुर्व आमदार पप्पु कालानी यांनी भेट दिली.
त्या प्रसंगी मध्यवर्ती रुग्णालय चे मुख्य शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे उपस्थित राहून हस्ताक्षर अभियानात भाग घेतला व समर्थन दिले,
तसेच पप्पु कालानी यांचेशी कार्यालयात हस्ताक्षर अभियान प्रणेते आनंद दादा ओव्हाळ यांचे समवेत सविस्तर चर्चा करुन कामाची माहिती दिली,
सदरप्रसंगी बौद्धविहार संघटना समन्वय समिती चे कार्यकर्ते नवीन गायकवाड़, मिरा सपकाळे, विनायक आठवले, रोहिणी जाधव व विजय हळदे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार