पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आयुक्त यांना महिलांनी केली अर्जाद्वारे विनंती
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आयुक्त यांना महिलांनी केली अर्जाद्वारे विनंती
उल्हासनगर कॅम्प नंबर तीन या ठिकाणी कांबळे चाळ परिसरात राहत असलेल्या नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने परिसरातील महिलांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना विनंती अर्ज करून लवकरच उल्हासनगर कॅम्प नंबर 3 चोपडा कोर्ट जवळील,शिवसेना शाखेच्या मागे कांबळे चाळ या ठिकाणी पिण्याचे पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी असा विनंती अर्ज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांना मनपा नागरी सुविधा सीएफसी कार्यालयातून देण्यात आला तसेच पाणीपुरवठा चे मुख्याधिकारी परमेश्वर बुडगे यांना ही देण्यात आला मागील 3-4 महिन्या पासून कांबळे चाळ परिसरात राहतं असलेल्या सौ. सुमन शेंडगे व ज्योती पवार यांनी पाणी पुरवठाचे संबंधित अधिकारी यांना तोंडी तक्रार करून सुद्धा आजपर्यंत तक्रार दूर झाली नसल्याने अखेर मनपा आयुक्त यांना व पाणी पुरवठा अधिकारी बुडगे यांना विनंती अर्ज करून वस्तीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा असा विनंती अर्ज करण्यात आला असता पाणी पुरवठा अधिकारी बुडगे यानी येत्या 2 -4 दिवसात कांबळे चाळ परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होईल असे आश्वासन देऊन अर्ज स्वीकारला या वेळी संपादक हरी आल्हाट, पत्रकार अशोक शिरसाट उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद