पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा द्या, डेमू-मेमू ऐवजी EMU लोकल सुरु करा, रेल्वे प्रवाशांची मागणी

पुणे-दौंड मार्गाला उपनगरीय दर्जा द्या, डेमू-मेमू ऐवजी EMU लोकल सुरु करा, रेल्वे प्रवाशांची मागणी
पुणे: पुणे ते दौंड मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रश्नाकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुणे दौंड मार्गाचा उपनगरीय रेल्वे मार्गात समावेश करावा, अशी मागणी रेल्वे बोर्ड व राज्य शासनाला पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपकडून करण्यात आली आहे.पुणे दौंड मार्गावर इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (ईएमयू) दोन रेक दिले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

पण, अद्याप तरी या मार्गावर हे दोन रेक मिळालेले नाहीत. पुणे दौंड मार्गावर सध्या डेमू चालविली जाते. पण, तिला सतत बाजूला उभे केल्यामुळे गाडीला उशीर होता. त्यामुळे या मार्गाला उपनगरीय रेल्वे मार्गाचा दर्जा देण्याची मागणी पुणे जिल्हा ग्रामीण रेल्वे प्रवासी संघाकडून करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या- पुणे दौंड मार्गावर डेमू-मेमू ऐवजी ईएमयू लोकल सेवा सुरू करा- ईएमयूचा रेक हा डब्यांच्या असल्यामुळे त्यात महिला, सामान, दिव्यांग, फर्स्ट क्लास इत्यादींसाठी स्वतंत्र डबे द्या 

हा रेक आरामदायक आहे.- डेमूमध्ये फक्त आठ ते दहा कोच असल्यामुळे प्रंचड गर्दी होऊन महिला प्रवाशांची असुरक्षितता निर्माण होते.- आष्टी-अहमदनगर मार्गावर आगीच्या घटनेमुळे पुणे दौंड मार्गावर धावणारे डेमू-मेमू बदलावेत- पुणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये पुणे-दौंड मार्गाचा समावेश करावा.- अनेक दशकांपासून पुणे-दौंड हा उपनगरी नसलेला विभाग आहे.- पुणे-दौंड दरम्यानच्या प्रवाशांच्या प्रवासात अडथळे येत आहेत.- - पुणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील सर्व स्टेशन (हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, येवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस) समाविष्ट करा.

आम्ही दररोज पुणे-दौंड सेक्शन दरम्यान प्रवास करतो. परंतु कोणतीही तत्पर कारवाई आणि दैनंदिन प्रवाशांना चांगली वागणूक मिळत नाही. प्रवाशांच्या समस्यांबाबत रेल्वे प्रशासन व्यवस्थित उत्तरे देत नाहीत. पुणे-दौंड मार्गाच्या समस्या व मागण्यांबाबत रेल्वे बोर्ड व राज्य शासनाला ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले आहे, असं पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपचे कार्याध्यक्ष प्रमोद उबाळे यांनी सांगितलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार