महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनाचे वतीने उल्हासनगर महानगर पालिका गेटवर धडक मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनाचे वतीने उल्हासनगर महानगर पालिका गेटवर धडक मोर्चा उल्हासनगर ( प्रतिनिधी अशोक शिरसाट )      महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनाचे राज साहेब ठाकरे तसेच संदीप देशपांडे यांच्या आदेशानुसार आणि उल्हासनगर महानगरपालिका युनिट चे अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात, उपाध्यक्ष हरी चंदर आल्हाट यांच्या माध्यमातून उल्हासनगर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या बाबत दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी महानगरपालिका गेटवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महानगरपालिका कर्मचारी यांच्या एकूण १८ मागण्या निवेदन पत्रामध्ये नमूद केल्या असून मागण्या खालील प्रमाणे आहेत१) सातव्या आयोगाची थकीत फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दोन टप्प्यात देण्यात यावी,          २) वर्ग चार च्या विविध संवर्गातील कर्मचारी यांना मुकादम या पदासाठी पात्र कर्मचाऱ्यांची अंतिम यादी दोन दोन वेळा महापालिका नोटीस बोर्डावर लावली जाते परंतु पदोन्नती दिली जात नाही,                              
३) सफाई कामगार राहत असलेल्या वाल्मिकी वसाहत इमारतीमधील घरे त्यांच्या मालकी हक्काचे करणे बाबत तातडीने निर्णय घ्यावा.    ४) सामान्य प्रशासन विभागात सेवा जेष्ठतेनुसार मुख्य लिपिक यांच्या नियुक्ती करण्याबाबत.        ५) कोरोना काळात कोविड मध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता  मिळणेबाबत.        ६) ज्या कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे अशा कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत पदोन्नती मिळण्याची प्रकरणे असल्यास अशी प्रकरणे होऊ नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी.              ७) सर्व कर्मचाऱ्यांना १०,२०,३० वर्षाचा लाभ देण्यात यावा याबाबत
८) सफाई कामगारांना आपल्या कामाच्या ठिकाणी हजेरी शेडची व्यवस्था करून देणे बाबत.
९) वाल्मिकी समाजातील वारसा हक्कातील कर्मचाऱ्यांना शिक्षण अहर्तेनुसार थेट नियुक्ती देण्यात आलेल्या आहे मग हरेश बहेनवाल याची सुरुवातीपासून मागणी असताना मुख्यालय उपायुक्त यांनी ती पूर्ण केली नाही याबाबत दूजाभाव केलेला दिसत आहे.                        १०) प्रभाग समिती क्रमांक ३ चा ठेका रद्द करणे बाबत
११) जुनी पेन्शन योजना  सुरू करावी याबाबत.  १२) सेवानिवृत्त कर्मचारी यांना सातव्या वेतनाची थकीत रक्कम एक रक्कमी देणे बाबत.              १३) मनपा अधिकारी कर्मचारी व आरोग्य विभागातील सफाई कामगारांना मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी स्वतंत्र वार्ड सुविधा/ व्यवस्था उपलब्ध करून घेणेबाबत
१४) सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व मृत्यू पावलेले कर्मचारी यांच्या वारसांना वारसा हक्क पद्धतीने तात्काळ कामावर घेण्यात यावे.                      १५) सन २०१५ नंतर आपण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना सोडून इतर जातीच्या ओपन किती उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले याबाबत नावासह माहिती उपलब्ध ठेवावी.        १६) सफाई कामगारांना राहण्यासाठी देण्यात आलेल्या उल्हासनगर ५ येथील वाल्मिकी वसाहत तीन इमारती दुरुस्त करण्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे.                        १७) महापालिका आस्थापनेतील महिला अधिकारी/ कर्मचारी यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळावी.                                  १८) एल एस जी डी/एल जी एस/डी एल जी एफ एम या परीक्षा पास झालेल्या कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे आगाऊ वेतन वाढ लागू करण्यात यावी या मागण्याकरिता मनपा मुख्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी कार्यालय प्रमुख किशोर चौव्हान, तसेच शालिग्राम सोनवणे, रमेश वाघेला, हर्षद पठाडे, अनिल देवकर, नरेश चंडालिया, निलेश मगरे, श्रावण शेरे, भाऊसाहेब निकाळजे, संतोष उबाळे,भीमा कांबळे, पुंडलिक तरे, गोविंद देवकर, संतोष अवसरमल, अश्विन गोहील ,ज्योती पवार, निशा आल्हाट आणि कर्मचारी यांनी मनपा गेटवर मोर्चामध्ये सहभाग घेतला होता,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार