२६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात दिलीप ताहील मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत
२६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात दिलीप ताहील मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत
अभिनेता दिलीप ताहिल हे नाव घेतलं की, त्यांनी साकारलेल्या असंख्य वैविध्यपूर्ण भूमिका डोळयासमोर येतात. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते एका खलनायकी भूमिकेतून आपल्या समोर येणार आहेत. २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘छत्रपती संभाजी’ या चित्रपटात ते मुघल सरदार ‘मुकर्रब खान’ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांना पकडून मुघल सल्तनतीपुढे हजर करेल अशी प्रतिज्ञा करणारा मुघल सरदार मुकर्रब खान हा औरंगजेबाचा नातेवाईक. शेख निजाम अर्थात मुकर्रब खानाने संभाजी राजांना कपटाने पकडून औरंगजेबाच्या स्वाधीन केले. त्याबद्दल त्याला मुघल दरबारात मोठा मान मिळाला. ‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी ऐतिहासिक भूमिका मला करायला मिळाली. या चित्रपटातील क्रूर मुकर्रब खानची भूमिका करणं माझ्यासाठी चॅलेंजिंग व वेगळा अनुभव असल्याचं दिलीपजी सांगतात.
राकेश सुबेसिंह दुलगज यांनी 'छत्रपती संभाजी' चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. ‘परफेक्ट प्लस एंटरटेनमेंट’ आणि ‘एजे मीडिया कॉर्प’ प्रस्तुत हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये २६ जानेवारीला एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. अशी माहिती गणेश तळेकर यांनी जनहित न्युज महाराष्ट्रला दिली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद