उल्हासनगर महापालिका सामान्य प्रशासन विभागात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ--दिलीप थोरात
महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना चे वतीने विभागीय परीक्षा रद्द करणे बाबत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन पत्र
उल्हासनगर (प्रतिनिधी अशोक शिरसाट)
महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना चे युनिट अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात यांनी उल्हासनगर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अजिज शेख यांना निवेदन पत्र देऊन विभागीय परीक्षा रद्द करणे बाबत मागणी केली आहे.
सदर निवेदन पत्रात म्हटले आहे की महापालिकेत सेवा प्रवेशोत्तर/विभागीय परीक्षा घेण्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे या अगोदरही अशा प्रकारे विभागीय परीक्षा घेण्याचा निर्णय झाला होता त्यावेळेला देखील संघटनेने विरोध केल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या, यात जर आपण विभागीय परीक्षा घेत असाल तर या अगोदर ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्या त्यांच्या सर्वांच्या परीक्षा का घेण्यात आल्या नाही, यावर सुद्धा प्रश्नचिन्ह संघटनेने या अगोदरही सामान्य प्रशासन विभागाचे उप आयुक्त अशोक नाईकवाडे यांच्यावर आरोप केलेले आहेत आणि यांच्यामुळेच सामान्य प्रशासन विभागात खूप मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ अंदाधुंदी सुरू आहे, बऱ्याच पदोन्नती दिल्या त्यांच्या परीक्षा घेतल्या जात नाही तर त्यांच्याकडून काय घेतले म्हणून आयुक्त साहेब आपण जातीने लक्ष घालून विभागीय परीक्षा रद्द करावी, कारण सध्या स्थितीत कर्मचाऱ्यांची मनस्थिती ठीक नाही सर्वांवर कामाचा ताण तणाव व निवडणुकीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे प्रत्येक कर्मचारी कामांमध्ये व्यस्त आहे नियम सर्वांसाठी एक असणे गरजेचे आहे म्हणून दिनांक 17 फेब्रुवारी 2024 ते दिनांक 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान सेवा प्रवेशोत्तर/विभागीय परीक्षा रद्द करून सेवा जेष्ठता यादीनुसार पदोन्नती करावी जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार होईल अन्यथा संघटनेच्या वतीने परीक्षा ठिकाणी आंदोलन करून परीक्षा उधळली जाईल याची काळजी प्रशासनाने घ्यावी , असे निवेदन पत्र महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना चे युनिट अध्यक्ष दिलीप सखाराम थोरात यांनी ठामपणे देऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख तसेच अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना निवेदन पत्र द्वारे आव्हान केले आहे सदर निवेदनाच्या मागणीनुसार परीक्षा रद्द न झाल्यास संघटनेच्या वतीने परीक्षा ठिकाणी आंदोलन करण्यात येईल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद